उरुळी कांचन : मद्यप्राशन करून घरात घुसून महिलेचा विनयभंग करत घरातील व्यक्तींना दगड फेकून त्यांना जखमी केल्याची घटना प्रयागधाम (ता. हवेली) परिसरात मंगळवारी (ता. ३०) रात्री साडे सात च्या सुमारास घडली.
या प्रकरणी नन्या मांजरे, ओंकार मांजरे, अजय पवार, सुरज जाधव, अनष मांजरे (सर्व रा. जय मल्हार रॊड, उरूळी कांचन, ता. हवेली) या पाच जणांविरोधी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एका २२ वर्षीय महिलेने उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
उरुळी कांचन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (ता. ३०) रात्री साडे सात च्या सुमारास २२ वर्षीय महिला घरात असताना आरोपी नन्या मांजरे (वय ४० रा. जय मल्हार रोड, उरूळी कांचन, ता. हवेली) याने लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. तो मद्यप्राशन केलेल्या अवस्थेत होता.
त्याने तिथे त्याचे आरोपी साथीदार ओंकार मांजरे, अजय पवार, सुरज जाधव, अनष मांजरे यांना बोलावून घेतले. ते आल्यानंतर नन्या आणि त्याच्या आरोपी साथीदारांनी फिर्यादीच्या घरातील लोकांवर दगड फेकून मारून जखमी केले. अधिक तपास उरुळी कांचन पोलीस करीत आहेत.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.