पाणीपट्टीचे 225 कोटी वसूल 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 एप्रिल 2019

पुणे -  खडकवासला पाटबंधारे विभागाने 2018-19 या वर्षात 225 कोटी एवढी विक्रमी सिंचन आणि बिगर सिंचन पाणीपट्टीची वसुली केली आहे. त्यात पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेसह ग्रामीण भागातील पाणी वापर सिंचन संस्थांकडील थकबाकीचा समावेश आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा पाणीपट्टीच्या वसुलीत दुपटीने वाढ झाली आहे. गतवर्षी 103 कोटी रुपये पाणीपट्टीची वसुली झाली होती. 

खडकवासला प्रकल्पात खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर ही चार धरणे येतात. या प्रकल्पामधून पुणे शहरातील सुमारे 45 लाख नागरिक आणि पवना धरणातून पिंपरी-चिंचवड शहरातील सुमारे 25 लाख नागरिकांना पाणीपुरवठा होतो. तसेच, जिल्ह्यातील हवेली, दौंड, इंदापूर, बारामती आणि मावळ तालुक्‍यातील शेती सिंचनासाठी आणि नागरिकांना पिण्यासाठी पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी खडकवासला पाटबंधारे विभागाकडे आहे. 

यासंदर्भात खडकवासला प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता पांडुरंग शेलार म्हणाले, "पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेकडील पाणीपट्टी थकबाकीच्या वसुलीसाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. या दोन्ही शहरांच्या पाणीपुरवठ्यासह ग्रामीण भागातील सिंचन व्यवस्थापनाचे उत्कृष्ट नियोजन करण्यात आले. ग्रामीण भागात वसुली मोहीम राबविण्यापूर्वी पाणी वापर संस्था आणि शेतकरी यांच्यात जनजागृती करण्यात आली. राज्यातील सर्व पाटबंधारे विभागांपैकी खडकवासला विभागाची ही सर्वाधिक पाणीपट्टी वसुली आहे.' 

Web Title: 225 crore of Water tax has been recovered from the Khadakwasla Irrigation Department