23 lakhs fraud with businessman by worker 381 grams gold fraud crime police pune
23 lakhs fraud with businessman by worker 381 grams gold fraud crime police punesakal

Pune Crime : कारागिरांकडून सराफाची २३ लाखांची फसवणूक

सोन्याचे दागिने घडविणाऱ्या कारागिरांनी एका सराफाची २३ लाख रुपयांची फसवणूक केली.

पुणे : सोन्याचे दागिने घडविणाऱ्या कारागिरांनी एका सराफाची २३ लाख रुपयांची फसवणूक केली. दोघे कारागीर ३८१ ग्रॅम सोने घेऊन पसार झाल्याची घटना रविवार पेठेतील सराफ बाजारात घडली. याप्रकरणी सराफा व्यावसायिक जॉयनाक्ष परबोती माईती (वय ५७, रा. रविवार पेठ) यांनी फिर्याद दिली आहे.

त्यावरून फरासखाना पोलिस ठाण्यात दोघा कारागिरांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. सौरभ प्रसन्नजित माईती (रा. पूर्व मेदिनपुरा, पश्चिम बंगाल) आणि संजय तपनकुमार जाना (रा. कुरपई, पश्चिम बंगाल) अशी कारागिरांची नावे आहेत.

रविवार पेठेत फिर्यादी जॉयनाथ माईती यांची सराफा पेढी आहे. त्यांनी ऑर्डरनुसार दागिने घडविण्यासाठी ३ एप्रिल रोजी त्यांच्याकडील दोघा कारागिरांना ३८१ ग्रॅम सोने दिले होते. परंतु कारागिरांनी सराफ व्यावसायिकाला दागिने घडवून दिले नाहीत. कारागीर पसार झाल्याचे लक्षात आल्यानंतर सराफा व्यावसायिकाने फरासखाना पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com