

Suspicion Leads to Crime: Farmer Kidnapped and Assaulted, Two Arrested by Police
esakal
उंडवडी : पत्नीला मेसेज पाठवत असल्याच्या संशयातून एका २३ वर्षीय तरुण शेतकऱ्याचे अपहरण करून त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना सुपा परिसरात घडली. या प्रकरणी सुपा पोलिसांनी दोन सराईत गुन्हेगारांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) व भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले आहे.