esakal | काय सांगता? एका महिलेमुळं इंदापूरातील सहा गावे बफर झोनमध्ये!
sakal

बोलून बातमी शोधा

Buffer_Zone

घोरपडवाडी गावातील कोरोनागस्त महिलेच्या संपर्कात आलेल्या पाच नागरिकांचे घशातील द्रवाचे नमुने घेवून तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत.

काय सांगता? एका महिलेमुळं इंदापूरातील सहा गावे बफर झोनमध्ये!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वालचंदनगर (पुणे) : इंदापूर तालुक्यातील घोरपडवाडी मधील एक महिला कोरोनागस्त आढळल्यानंतर पश्‍चिम भागातील सहा गावांमध्ये बफर झोन जाहीर करण्यात आला आहे. राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी घोरपडवाडी गावाला भेट देवून परस्थितीची माहिती घेऊन नागरिकांनी घाबरुन न जाता स्वत:ची आणि कुटुंबाची काळजी घेण्याचे आवाहन केले.

- महावितरण कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय; कोरोनाने मृत्यू झाल्यास मिळणार 30 लाख रूपये

घोरपडवाडीतील एका महिलेला कोरोनाची लागन झाल्याचे निष्पन झाल्यानंतर प्रशासन सर्तक झाले आहे. इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागातील कोरोनाचा पहिलाच रुग्ण आहे. घोरपडवाडी गाव हे प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित केले असून आरोग्य विभागाच्या माध्यमातून गावामध्ये सर्वेक्षण सुरु केले आहे.

- बनावट प्रवासी पास तयार करून त्याची विक्री करायचा फोटोग्राफर; मग...

गावामध्ये ३०४ कुंटुंबे असून १४०१ लोकसंख्या आहेत.यातील ९० व्यक्ती हायरिस्क मध्ये असून यामध्ये लहान मुले,ज्येष्ठ नागरिक तसेच रक्तदाब व शुगर असलेल्या नागरिकांचा समावेश आहे. आज रविवार (ता.२१) रोजी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी तातडीने गावाला भेट देवून नागरिकांनी घाबरुन न जाता काळजी घेण्याचे आवाहन केले.इंदापूरच्या तहसीलदार सोनाली मेटकरी, वालचंदनगर पोलिस ठाण्याचे साहय्यक पोलिस निरीक्षक दिलीप पवार , जिल्हा परिषद सदस्या भारती दुधाळ, अभिजित तांबिले, मोहन दुधाळ यांनी घोरपडवाडी गावाला भेट देवून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले.

- उपअधीक्षक झालेला प्रविण सांगतोय 'एमपीएससी'चा 'सक्सेस मंत्र'!

सहा गावामध्ये बफर झोन...
घोरपडवाडी गावालगत असणारे निमसाखर, सराफवाडी, दगडवाडी, हगारवाडी, पिटकेश्‍वर, गोतोंडी ही सहा गावे बफर झोन म्हणून जाहीर केली आहेत. सहा गावांची लाेकसंख्या १७८९० असून सहा गावामध्ये सर्वेक्षण सुरु केले असल्याची माहिती निरवांगी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत महाजन यांनी दिली.

- बारामतीकरांसाठी दिलासादायक बातमी; आता संध्याकाळी सातपर्यंत...

पाच जनांचे नुमने घेणार...
घोरपडवाडी गावातील कोरोनागस्त महिलेच्या संपर्कात आलेल्या पाच नागरिकांचे घशातील द्रवाचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत. तसेच ही महिला इंदापूरमधील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी एक दिवस अॅडमिट असल्याने महिलेच्या संर्पकात आलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना लक्षणे आढळल्यास त्यांचे ही नमुने तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

loading image