शहरात चोवीस तास ढगाळ वातावरण 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 मे 2017

पुणे - पुण्यासह मध्य महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांपासून उन्हाचा चटका पुन्हा वाढला आहे. पुण्यात कमाल तापमान 39.5 अंश सेल्सिअस इतके 

नोंदले गेले असून, राज्यात सर्वाधिक तापमान अकोला येथे 43.4 अंश सेल्सिअस नोंदले गेले. पुणे शहर आणि परिसरात पुढील चोवीस तासांत ढगाळ वातावरणाची शक्‍यता आहे. त्यामुळे कमाल तापमान पुढील दोन दिवसांत 37 अंश सेल्सिअसपर्यंत खाली येईल, असा अंदाज हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात आला आहे. 

राज्यातील बहुतांश भागात ढगाळ वातावरण होते. त्यामुळे मराठवाडा आणि विदर्भातील कमाल तापमानाचा पारा सरासरीच्या जवळपास राहिला. मध्य महाराष्ट्रात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत अंशतः वाढ झाली. 

विदर्भ ते मध्य प्रदेश या दरम्यान चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे विदर्भात पुढील दोन दिवसांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्‍यता हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात आली. 

मराठवाडा ते कर्नाटकच्या समुद्रसपाटीपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे पुण्यासह मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये ढगाळ वातावरण असेल. पुण्यात त्यामुळे तापमानाचा पारा पुढील दोन दिवसांमध्ये कमी होईल, असेही खात्यातर्फे स्पष्ट करण्यात आले.

Web Title: 24 hours cloudy atmosphere in the city