व्हॅट, व्यवसाय करांच्या थकबाकीसाठी 24 पर्यंत मुदत

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 नोव्हेंबर 2016

पुणे- मूल्यवर्धित (व्हॅट) आणि व्यवसायकराची थकबाकी भरण्यासाठी 24 नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. पाचशे व हजार रुपयांच्या जुन्या नोटा भरून व्यापारी या करांच्या थकबाकीचा भरणा करू शकतात. या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन विक्रीकर विभागाने केले आहे.

व्यवसायकराची थकबाकी मोठ्या प्रमाणात आहे. यासह अन्य करांची थकबाकी भरण्याची सुविधा सर्व राष्ट्रीयीकृत बॅंकांमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. नगर रस्त्यावरील आगाखान पॅलेसजवळील युनियन बॅंक ऑफ इंडियाच्या शाखेत यासाठी स्वतंत्र व्यवस्थाही केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: 24 november deadline for pending vat

टॅग्स