पुणे जिल्ह्यात गुरुवारी २४९ नवे कोरोना रुग्ण | Corona Patients | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Corona-patient
पुणे जिल्ह्यात गुरुवारी २४९ नवे कोरोना रुग्ण

पुणे जिल्ह्यात गुरुवारी २४९ नवे कोरोना रुग्ण

पुणे - पुणे जिल्ह्यात गुरुवारी (ता. २५) दिवसभरात २४९ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. याउलट दिवसभरात १५० जण कोरोनामुक्त झाले आहेत. अन्य चार जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. दिवसातील कोरोना मृत्यूमध्ये पुणे शहरातील दोन आणि पिंपरी चिंचवड व जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील प्रत्येकी एक मृत्यू आहे.

जिल्ह्यातील दिवसातील एकूण नवीन कोरोना रुग्णांमध्ये पुणे शहरातील ९० रुग्ण आहेत. दिवसभरात पिंपरी चिंचवडमध्ये ५६, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात ७१, नगरपालिका हद्दीत २९ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात तीन नवीन रुग्ण सापडले आहेत. दिवसातील एकूण कोरोनामुक्तांमध्ये पुणे शहरातील ४७, पिंपरी चिंचवडमधील ६१, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ३१, नगरपालिका हद्दीतील सहा आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील पाच जणांचा समावेश आहे.

हेही वाचा: न्यासाच घेणार आरोग्य विभागाची फेर परीक्षा

सद्यःस्थितीत पुणे जिल्ह्यात एकूण २ हजार ७७ सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. यापैकी शहर व जिल्ह्यातील विविध रुग्णालयांत ७१५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. उर्वरित १ हजार ३६२ जण गृह विलगीकरणात आहेत. एकूण सक्रिय रुग्णांमध्ये पुणे शहरातील ८६४, पिंपरी चिंचवडमधील ३७३, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ६८८, नगरपालिका हद्दीतील १२६ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील २६ रुग्ण आहेत.

loading image
go to top