२५ महिला बचत गटांची पुरग्रस्थांना मदत

महिला बचत गटांनी जपली सामाजिक बांधिलकी
महिला बचत गट
महिला बचत गटsakal

इंदापूर :येथील साऊ जिजाऊ महिला ग्रामसंघाअंतर्गत २५ महिला बचत गटांनी २० ते २५ क्विंटल धान्य,कपडे ,साड्या तसेच इतर साहित्य पूरग्रस्तांसाठी बारामती ऍग्रिकल्चरल ट्रस्टच्या विश्‍वस्त सौ. सुनंदा पवार, जिल्हा परिषद सदस्यअभिजित तांबिले यांच्या उपस्थितीत रवाना केली. या मदतीसाठी उन्नती, जागृती,येडेश्वरी,जोगेश्वरी ,महालक्ष्मी, रमाई, पंचशील, क्रांती,रघुवीर समर्थ,जय माता, एकता, प्रेरणा, वैष्णवी देवी, ऋणानुबंध, विघ्नहर्ता,प्रगती,लोकसेवा ,आंदुबाई, जिजाऊ, सावित्रीबाई, माऊली, शिवकन्या, भिमाई, दिव्यज्योती,कुलस्वामिनी या बचत गटांनी सहभाग दिला.

महिला बचत गट
जुन्नर : चार वर्षांपासून फरार असलेल्या कुख्यात दरोडेखोराला अटक

यावेळी महिला बचत गट तालुकाव्यवस्थापक राणी ननवरे, प्रभाग समन्वयक अमर कदम , बाळासाहेब नगरे, अशोक शिंदे,उपसरपंच तेजमाला बाबर, ग्रामपंचायत सदस्य,संघाचे अध्यक्ष लक्ष्मी कसबे,सचिव स्वाती ननवरे, कोषाध्यक्ष फातिमा शेख उपस्थित होत्या. यावेळी सुनंदा पवार म्हणाल्या, या महिला बचत गटांनी सामाजिक बांधिलकी जपत स्तुत्य उपक्रम राबविला असून त्यांची दानत मला खूप आवडली आहे. गाव समन्वयक निलोफर पठाण यांचे कार्य कौतुकास्पद आहे.

महिला बचत गट
निमिषा झा, अमरेश मिश्रा यांना ब्रिटनची चेव्हनींग शिष्यवृत्ती जाहीर

यावेळी त्यांनी स्त्री शक्ती, बचत गट,महिला सबलीकरण, महिलांचे आरोग्य, भीमथडी ,महिला उद्योजकांनी पाळावयाचे पथ्य या विषयी मुक्तसंवाद साधत उद्योगासाठी मदत करण्याचे आश्वासन देखील दिले. यावेळी त्यांनी महिलांनी तयार केलेल्या पर्स, कागदी व कापडी पिशव्या, खाद्यपदार्थ, विणकाम, पायपुसण्या या वस्तूंचे कौतुक केले. जिल्हा परिषद सदस्य अभिजीत तांबिले यांनी साऊ जिजाऊ ग्रामसंघाच्या कार्याचे कौतुक करून ग्रामसंघ कार्यालयासाठी सात लाख रुपये निधी देण्याची घोषणा केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com