esakal | ‘कॉईन एक्सचेंज’ उपक्रमाला प्रतिसाद; ५० लाखांची नाणी वितरीत
sakal

बोलून बातमी शोधा

cosmos

कॉसमॉसच्या ‘कॉईन एक्सचेंज’ उपक्रमाद्वारे ५० लाखांची नाणी वितरीत

sakal_logo
By
मंगेश कोळपकर (mangesh.kolapkar@esakal.com)

पुणे: कॉसमॉस बँकेने आयोजित केलेल्या ‘कॉईन एक्सचेंज’ उपक्रमात अवघ्या दोन दिवसांत तब्बल ५० लाख रुपयांच्या नाण्यांचे शहर व परिसरातील चार शाखांतून वितरण झाले. १, २, ५ आणि १० रुपयांच्या नाण्यांचा त्यात समावेश होता.

हेही वाचा: Pune : गृहनिर्माण संस्थांसाठी निवडणूक प्रशिक्षण ॲप

गणेशोत्सव, दसरा, दिवाळी यासारखे उत्सव व सणांच्या काळात बाजारपेठेतील खरेदी-विक्री वाढते, ही बाब लक्षात घेऊन कॉसमॉस बॅंकेने ग्राहक आणि व्यापारी वर्गासाठी कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन काटेकोरपणे करीत, ‘कॉईन एक्सचेंज’ उपक्रमाचे आयोजन ३ व ४ सप्टेंबर रोजी केले होते. या उपक्रमाचे उद्घाटन रिझर्व बँकेचे जनरल मॅनेजर (इश्यू डिपार्टमेंट) मनोज रंजन यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी रिझर्व बँकेचे वरिष्ठ अधिकारी संघर्ष बोरसे आणि रोहन वेदपाठक उपस्थित होते.

रिझर्व बॅंकेच्या बेलापूर शाखेच्या विशेष सहकार्याने व बँकेच्या करन्सी चेस्ट विभागातर्फे यूनिव्हर्सिटी रोड, चिंचवड, पर्वती दर्शन आणि लक्ष्मी रोड या शाखांमध्ये कॉईन एक्सचेंज हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. सुट्ट्या नाण्यांची आवश्यकता विचारात घेऊन नाण्यांचे वितरण मोठ्या प्रमाणात करण्यात आले. या उपक्रमाला ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.

हेही वाचा: कुत्र्याचा राग मालकावर; कारची काच फोडून ४४ हजार लंपास

बँकेतर्फे पुन्हा लवकरच दिवाळीपूर्वी सर्व शाखांमध्ये अशा उपक्रमाचे आयोजन करण्याचा प्रयत्न असल्याचे बँकेच्या डेप्युटी जनरल मॅनेजर अर्चना जोशी यांनी सांगितले. कॉईन एक्सचेंज उपक्रमाच्या उदघाटन समारंभाप्रसंगी बँकेच्या जॉईट मॅनेजिंग डायरेक्टर अपेक्षिता ठिपसे, जनरल मॅनेजर अविनाश चव्हाण तसेच करन्सी चेस्टचे मॅनेजर नंदकिशोर चांदेकर आणि बँकेचे अनेक मान्यवर ग्राहक उपस्थित होते.

loading image
go to top