Home Selling : पुणे शहरात महागड्या घरांच्या विक्रीत २५० टक्के वाढ

जानेवारी ते जून २०२३ दरम्यान पुण्यात एक कोटी किंमत (करारातील रकमेनुसार) असलेल्या पाच हजार ४११ फ्लॅटची विक्री झाली.
Home Selling
Home Sellingesakal

पुणे - बदललेल्या जीवनशैलीनुसार निर्माण झालेली मोठ्या घरांची मागणी, गरजेनुसार सोयीचे ठरेल अशा परिसरातच सदनिकेची खरेदी, तसेच कोरोनानंतर घर कसे असावे, याबाबत वाढलेल्या अपेक्षा यामुळे शहरात महागड्या सदनिकांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. एक कोटीपेक्षा जास्त किंमत असलेल्या घरांची विक्री २०१९च्या तुलनेत २०२३च्या पहिल्याच सहामाहीत २५० टक्क्यांनी वाढली आहे.

जानेवारी ते जून २०२३ दरम्यान पुण्यात एक कोटी किंमत (करारातील रकमेनुसार) असलेल्या पाच हजार ४११ फ्लॅटची विक्री झाली आहे. या फ्लॅटचे एकूण मूल्य आठ हजार १६२ कोटी रुपये आहे. गेल्या वर्षी याच काळात चार हजार घरांची विक्री झाली होती. त्यातून सहा हजार ३२१ कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचे ‘क्रेडाई पुणे मेट्रो’ने तयार केलेल्या अहवालात नमूद आहे.

कोरोनाकाळात प्रत्येकाला मोठ्या घराचे महत्त्व समजले. त्यामुळे आता घर घेताना त्यांची किंमत आणि घर किती मोठे आहे यावर जास्त लक्ष दिला जात आहे, तसेच घर खरेदीदारांमध्ये युवा वर्गाचा समावेश सर्वाधिक आहे.

आपल्या जीवनशैलीला साजेसे घर घेण्याला त्यांचे प्राधान्य आहे. जुनी व छोटी असलेली सदनिका विकून मोठे घर घेणाऱ्यांची संख्यादेखील लक्षणीय आहे. त्यामुळे सध्या महागड्या आणि मोठी घरांची मागणी आहे. गेल्या दीड वर्षात ही मागणी झपाट्याने वाढल्याचे दिसते.

- सूर्यकांत काकडे, बांधकाम व्यावसायिक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com