esakal | पुणे जिल्ह्यात आरोग्यसेवकांच्या चारशे जागांसाठी २५ हजार इच्छुक
sakal

बोलून बातमी शोधा

Doctor

पुणे जिल्ह्यात आरोग्यसेवकांच्या चारशे जागांसाठी २५ हजार इच्छुक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - पुणे जिल्ह्यातील (Pune District) प्राथमिक आरोग्य केंद्रातील (Health Center) पुरुष व महिला आरोग्यसेवकांच्या ४०० रिक्त जागांसाठी २५ हजार युवक-युवतींनी अर्ज (Form) केले आहेत. यामुळे इच्छुकांमधून आता लेखी परीक्षा आणि मुलाखतीतील गुणांच्या आधारे पात्र आरोग्यसेवकांची निवड करण्याचा निर्णय जिल्हा परिषद प्रशासनाने घेतला आहे. यानुसार आक्टोबर महिन्यात लेखी परीक्षेचे नियोजन प्रशासनाने केले आहे.

या निर्णयामुळे दोन वर्षांच्या कालखंडानंतर या पदांसाठी अर्ज करणाऱ्या युवक-युवतींना दिलासा मिळाला आहे. ही सर्व पदे मागील तीन-चार वर्षांपासून रिक्त आहेत.

हेही वाचा: 'युट्युब' पाहून एटीएम फोडणारा मुलगा जेरबंद

या परीक्षेसाठी माध्यमिक शाळांची निवड करावी. ही निवड करण्यासाठी आणि परीक्षेची बैठक व्यवस्था करण्यासाठी माध्यमिक शिक्षण विभागाची मदत घ्यावी. शिवाय शाळा निवडीसाठी जिल्ह्यातील विविध शाळांना भेटी द्याव्यात, असा आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांना दिला आहे.

जिल्ह्यात ९६ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ५३९ आरोग्य उपकेंद्र आहेत. या सर्व आरोग्य केंद्रांत मिळून सहायक परिचारिकांच्या (ए.एन.एम.) २५० आणि पुरुष आरोग्य सेवकांच्या (एमपीडब्ल्यू.) १५० जागा रिक्त आहेत.

या रिक्त पदांसाठी इच्छुकांकडून २०१९ मध्ये अर्ज मागविण्यात आले होते. परंतु त्यानंतर या पद भरतीस सरकारने स्थगिती दिली होती. त्यामुळे त्या वेळी ही भरती होऊ शकली नव्हती. आता ही स्थगिती उठविली आहे. रिक्त जागांच्या तुलनेत मोठ्या संख्येने इच्छुक असल्याने लेखी परीक्षा आणि मुलाखतीतील गुणांच्या आधारे गुणानुक्रमानुसार निवड केली जाणार आहे.

- डॉ. भगवान पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे

loading image
go to top