esakal | टेकड्यांच्या संवर्धनासाठी २६ कोटी कोटींचा निधी
sakal

बोलून बातमी शोधा

parvati

पुण्यातील टेकड्यांच्या संवर्धनासाठी २६ कोटींचा निधी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : पाचगाव पर्वती, भांबुर्डे, वारजे येथील टेकड्यांवरील वनांचे संवर्धन करण्यासाठी महापालिका (Pune corporation), वन विभाग (forest deparment) आणि स्थानिक नागरिकांच्या माध्यमातून 'नागरी संयुक्त वन व्यवस्थापन योजने' अंतर्गत पुढील पाच वर्षात तब्बल २५ कोटी २५ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. त्यासाठीच्या धोरणास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने (Hemnat rasane) यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. (26 crore crore hill conservation say hemant rasane)

केंद्र सरकारने ग्रामीण भागात संयुक्त वन व्यवस्थापन योजना १९८८ मध्ये सुरू केली. त्याच धर्तीवर पुणे शहरात २००६ मध्ये वन खाते, पुणे महापालिका आणि स्थानिक नागरिकांच्या सहभागाने नागरी संयुक्त वन व्यवस्थापनाला सुरूवात झाली. त्यासाठी महापालिका आर्थिक मदत करत आहे. २००६ ते २०११ या कालावधीसाठी या योजनेसाठी १० कोटी २३ लाख रुपयांचा निधी दिला होता. त्यापैकी ९ कोटी ६१ लाख रुपयांची विकासकामे केली. २०१४ ते २०१९ या कालावधीसाठी ४ कोटी ८० लाख रुपयांचा निधी दिला होता, त्यातील २ कोटी ३१ लाखाचा निधी खर्ची पडला आहे. खर्च न झालेल्या रकमेवर सुमारे ६९ लाख ८५ हजार रुपयांचे व्याज जमा झाले आहे. हा निधी नागरी संयुक्त वन व्यवस्थापनाच्या बँक खात्यात जमा करण्यात येतो. २०२२ ते २०२७ या पाच वर्षासाठी निधी देण्याच्या प्रस्तावास वृक्ष संवर्धन समितीने जून महिन्यात मान्यता दिली होती.

हेही वाचा: नगदवाडी येथे दोन उदमांजरांना विहिरीतून जीवदान

रासने पुढे म्हणाले, 'पुणे शहर व परिसरात १ हजार ८२६ एकरचे वनक्षेत्र आहे. योजनेच्या पहिल्या टप्प्यात पाचगाव-पर्वती, भांबुर्डा, आणि वारजे या तीन ठिकाणी ९८८ एकर क्षेत्रावर वनसंवर्धनाचे काम सुरू झाले. दुसऱ्या या तीन ठिकाणांसह कोथरुड, धानोरी वनक्षेत्राचा समावेश केला जाणार आहेसुरक्षा भिंत बांधणे, वृक्षारोपण, रोपवाटीका, नालाबंडिंग, सुरक्षा रक्षक नेमणे अशा प्रकारची कामे करण्यात आली.'

हेही वाचा: ऑइल कंपन्यांची कोटीच्या कोटी उड्डाणे

१० वर्षासाठी १५ कोटी अन पाच वर्षासाठी २६ कोटी

नागरि संयुक्त वन व्यवस्थापन योजनेअंतर्गत २००६ ते २०११ व २०१४ ते २०१९ या दहा वर्षाच्या काळात १५.३ कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले होते मात्र, २०२२ ते २०२७ या कालावधीसाठी तब्बल २६ कोटी २५ लाख रुपये दिले आहेत. प्रत्येक वर्षात ५ कोटी २५ लाख रुपये खर्ची पाडले जाणार आहेत. या खर्चाच्या धोरणास आत्ता मान्यता दिली आहे, त्याचा तपशील नंतर उपलब्ध होणार आहे, असे अध्यक्ष रासने यांनी सांगितले.

टेकडी विकसीत वनक्षेत्र (एकर)

पाचगाव पर्वती ६१३

भांबुर्डा २५०

वारजे १२५

loading image