Pune Crime : धक्कादायक! 28 वर्षीय महिलेनं अल्पवयीन मुलावर केले लैंगिक अत्याचार, धमकी देऊन मोबाईलमध्ये...

एका महिलेने १७ वर्षीय मुलाला जबरदस्तीने शारीरिक संबंध करण्यास भाग पाडून त्याचे व्हिडिओ चित्रीकरण करवून घेतल्याची घटना समोर आली
28 year old woman held for sexually assaulting minor for a year crime police
28 year old woman held for sexually assaulting minor for a year crime policeSakal

पुणे : एका महिलेने १७ वर्षीय मुलाला जबरदस्तीने शारीरिक संबंध करण्यास भाग पाडून त्याचे व्हिडिओ चित्रीकरण करवून घेतल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी २८ वर्षीय महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पीडित अल्पवयीन मुलाने फिर्याद दिली आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष सोनवणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेच्या पतीचे कोरोनामुळे निधन झाले आहे. अल्पवयीन मुलगा महिलेच्या घराशेजारी राहतो. या महिलेने मुलाला ‘माझ्यासोबत जबरदस्ती केल्याची तक्रार पोलिसांत देईन,’ अशी धमकी देऊन शारीरिक संबंध करण्यास भाग पाडले.

त्यानंतर पुन्हा मुलाशी शारीरिक संबंध साधत त्याचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यास सांगितले. एक मे २०२१ पासून नोव्हेंबर २०२२ या कालावधीत हा प्रकार घडला. ही बाब मुलाच्या चुलत्याच्या निदर्शनास आली. चुलता आणि मुलाच्या कुटुंबीयांनी त्या महिलेला समज दिली. परंतु महिलेने त्यांचे ऐकले नाही. त्यानंतर पीडित मुलाच्या कुटुंबीयांनी पोलिस ठाणे गाठले. याबाबत मुलाने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी महिलेविरुद्ध लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com