esakal | एक लाख शेतकऱ्यांना २८४ कोटींची सवलत
sakal

बोलून बातमी शोधा

FARMER

एक लाख शेतकऱ्यांना २८४ कोटींची सवलत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : ‘कृषीपंप वीजजोडणी धोरण २०२०’ योजनेत सहभागी होत थकबाकी भरलेल्या पुणे जिल्ह्यातील १ लाख ८ हजार १३० मधून शेतकऱ्यांना जवळपास २८४ कोटी ३७ लाख रुपयांची सवलत मिळाली आहे.

हेही वाचा: पुणे : तिसऱ्या लाटेची तयारी, जम्बोला मान्यता

या धोरणानुसार कृषिपंपाच्या वीजबिलातून थकबाकीमुक्त करण्यासाठी जुन्या थकबाकीमध्ये ६६ टक्के सवलत देण्यात येते तर शिल्लक थकबाकीपैकी ५० टक्के थकबाकी मार्च २०२२ पर्यंत भरल्यास उर्वरित ५० टक्के थकबाकीदेखील माफ करण्यात येत आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील १ लाख ८ हजार १३० शेतकऱ्यांनी थकबाकीमुक्त योजनेत सहभाग नोंदवला आहे. यामध्ये त्यांनी थकबाकीपोटी ८४ कोटी ६८ लाख व चालू वीजबिलांच्या ९१ कोटी ६० लाख रुपयांचा भरणा केला आहे.

हेही वाचा: अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या तीन जणांना सहा महिन्यासाठी तडीपार

त्यामुळे या शेतकऱ्यांना थकबाकीपोटी भरलेल्या रकमेएवढी सवलत मिळाली आहे. यामध्ये २८ हजार ५८७ शेतकरी वीजबिलांमधून संपूर्णपणे थकबाकीमुक्त झाले आहेत. त्यांनी चालू वीजबिलासह थकबाकीच्या ५० टक्के रकमेचे एकूण ६९ कोटी ४८ लाख रुपयांचा भरणा केला आहे. त्यामुळे सुधारित थकबाकीमध्ये त्यांना आणखी ५३ कोटी २९ लाख रुपयांची सवलत व संपूर्ण थकबाकीमुक्ती मिळाली आहे.

loading image
go to top