तीन कोटी रुपयांची सोन्याची बिस्किटे जप्त

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

पुणे - प्रवाशाने दुबईहून विमानातून आणलेले तीन कोटी रुपये किमतीची दहा किलो 175 ग्रॅम वजनाची सोन्याची बिस्किटे सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केली. विमानतळावरील स्वच्छतागृहाच्या कचरापेटीमध्ये ही बिस्किटे लपवण्यात आली होती.

दुबईहून तस्करी करून सोने पुण्यात आणले जात असल्याची माहिती नव्याने स्थापन केलेल्या महसूल गुप्तवार्ता संचालनालयास मिळाली होती. या विभागाने ही माहिती सीमाशुल्क विभागास दिली. त्यानंतर विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुबईहून आलेल्या स्पाइसजेटच्या विमानातील सर्व प्रवाशांची कसून तपासणी केली. मात्र, त्यांच्याकडे काहीही आढळले नाही. त्यानंतर अधिकाऱ्यांनी सोन्याची तस्करी करणाऱ्या प्रवाशाला विमानतळावर शोधण्यास सुरवात केली.

दरम्यान, प्रवासी विमानातून पहिल्या मजल्यावर उतरून तेथून तपासणीसाठी खाली येतात. त्या ठिकाणी जवळच असलेल्या पुरुषांच्या
स्वच्छतागृहाची तपासणी केली. त्या वेळी तेथील कचरापेटीमध्ये मोबाईलच्या खोक्‍यामध्ये 86 सोन्याची बिस्किटे, 2 सोन्याची वेढणी, असा तीन कोटी नऊ लाख रुपयांचा ऐवज आढळून आला. यापूर्वी सात किलो सोने जप्त केले होते. त्यानंतर आता दहा किलो 175 ग्रॅम इतके सोने जप्त करण्यात आले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

Web Title: 3 crore rupees Gold Biscuit Seized Crime

टॅग्स