जुन्नरच्या पश्चिम आदिवासी भागतील गावे तीन दिवसांपासून अंधारात 

दत्ता म्हसकर
गुरुवार, 19 एप्रिल 2018

जुन्नऱ (पुणे) : जुन्नरच्या पश्चिम आदिवासी भागातील उंडेखडक व देवळे येथे अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे विजेचे खांब वाकले आहेत. यामुळे गेली दोन-तीन दिवसांपासून आदिवासी भागातील निमगिरी, देवळे, खैरे, खटकाळे, केवाडी, उंडेखडक, राजूर नंबर १ व २ हडसर, पेठेचीवाडी आदी गावे विजेच्या प्रकाशापासून वंचित आहेत.

सध्या लग्नसराई सुरू असल्याने अनेक गावात कार्यक्रमासाठी वीज उपलब्ध होत नसल्याने गावात अंधारमय वातावरण निर्माण झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. वीज नसल्याने नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. मात्र विद्यूत मंडळाने मात्र याकडे कानाडोळा केला आहे. दोन दिवस पूर्ण होऊनही अद्याप कोणताही कर्मचारी या भागात फिरकला नाही. यामुळे विद्युत महामंडळ जुन्नरच्या कारभारावर ताशेरे ओढले जात आहेत. यावेळी अनेक ग्रामस्थांनी लाईटचे जुने पोल बदलून नवीन पोल टाकून नादुरुस्त तारा देखील दुरुस्त करून लवकरात लवकर वीज प्रवाह सुरळीत करावा अशी मागणी केली  आहे. 

Web Title: for 3 days no electricity in some area of junnar