लर्निंग लायसनच्या परीक्षेत दररोज 30 जण अनुत्तीर्ण! 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

पुणे - वाहतुकीच्या नियमांची पुरेशी माहिती नसल्यामुळे वाहन चालविण्याचा शिकाऊ परवाना (लर्निंग लायसन) घेण्यासाठीच्या परीक्षेत दररोज सुमारे 25-30 उमेदवार नापास होत आहेत. संगणकीकृत पद्धतीने आणि वाहतुकीच्या किमान नियमांवर आधारित ही परीक्षा आहे. 

प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ) दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या शिकाऊ वाहन परवान्यासाठी दररोज परीक्षा घेतली जाते. परीक्षेत संबंधित उमेदवारांना 15 प्रश्‍न विचारले जातात. त्यापैकी किमान 9 प्रश्‍नांची उत्तरे बरोबर आल्यास उमेदवार उत्तीर्ण होतात. त्यासाठी नो एंट्री, नो पार्किंग, स्पीडब्रेकर आदी वाहतूक चिन्हांबाबत माहिती विचारली जाते. दररोज सुमारे 300 उमेदवार परीक्षा देतात. त्यातील सुमारे 30 उमेदवार अनुत्तीर्ण होतात, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे यांनी दिली. वाहतुकीच्या किमान नियमांचीही पुरेशी माहिती नसल्यामुळे हे उमेदवार परीक्षा उत्तीर्ण होऊ शकत नाही, असे निरीक्षण त्यांनी नोंदविले. गेल्या वर्षी 1 एप्रिल ते यंदा 31 मार्चदरम्यान 64 हजार 944 उमेदवारांनी शिकाऊ वाहन परवान्यासाठी परीक्षा दिली. त्यातील 59 हजार 99 उमेदवार उत्तीर्ण झाले, तर 5 हजार 845 उमेदवार अनुत्तीर्ण झाले, असेही त्यांनी सांगितले. एकदा अनुत्तीर्ण झाल्यावर संबंधित उमेदवाराला परीक्षेसाठी पुन्हा अपॉइंटमेंट घ्यावी लागते. 

Web Title: 30 Candidates Failed Daily in Learning License Exam