एसटीचा 30 टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 2 जून 2018

पुणे - शिवशाहीमध्ये ज्येष्ठ नागरिकांना सवलत दिल्यानंतर सामान्य प्रवाशांच्या खिशाला कात्री लावण्याची तयारी एसटी महामंडळाने केली आहे. तिकीट दरात ३० टक्के वाढी करण्याचा त्यांचा प्रस्ताव आहे.

इंधनाच्या (डिझेल) वाढत्या किमती, कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीमुळे येणारा आर्थिक बोजा, वाहनांच्या सुट्या भागांच्या वाढलेल्या किमती, तसेच महामार्गावरील टोल दरामध्ये झालेली वाढ लक्षात घेता प्रशासनाने भाडेवाढीचा हा प्रस्ताव महामंडळाच्या अध्यक्षांकडे पाठविला आहे.

डिझेल दरवाढीमुळे सुमारे ४७० कोटी रुपये अतिरिक्त रक्कम खर्च होणार असून तितकीच रकमेची कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीसाठी तरतूद करणे अपेक्षित आहे. यामुळे दोन हजार दोनशे कोटी रुपये संचित तोटा सहन करणाऱ्या एसटी महामंडळाला नाइलाजास्तव भाडेवाढ करणे गरजेचे आहे. भाडेवाढीचा प्रस्ताव अध्यक्षांकडे सादर केला आहे.

Web Title: 30 per cent of the proposed fares ST bus