
भोर (पुणे) : तालुक्यातील भाटघर धरण व वीर धरण प्रकल्पग्रस्त गावांमधील १८ प्रकारच्या सोयीसुविधांसाठी राज्य
शासनाकड़ून पहिल्या टप्यात ३० कोटी रुपये मंजूर करण्यात येणार असल्याची माहिती आमदार संग्राम थोपटे यांनी दिली.
राज्याचे मदत व पुर्नवसनमंत्री विजय वडेट्टीवार यांच्यासमवेत मंत्रालयामध्ये झालेल्या बैठकीत मंत्र्यांनी हा निधी तातडीने मंजूर करण्याचे मान्य करून शासनाला विकासकामांचा प्राधान्यक्रम ठरवून प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिल्याचेही आमदार संग्राम थोपटे यांनी स्पष्ट केले.
या बैठकीत मंत्री विजय वडेट्टीवार, आमदार संग्राम थोपटे, पुर्नवसन विभागाचे सचिव किशोर निंबाळकर, कॉग्रेसचे भोरचे तालुकाध्यक्ष शैलेश सोनवणे, जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल आवाळे, पंचायत समिती सदस्य रोहन बाठे. भाटघर प्रकल्पग्रस्त समितीचे अध्यक्ष विठ्ठल वरखडे, सचिव काळूराम मळेकर, वीर प्रकल्पग्रस्त समितीचे अध्यक्ष शंकर धाडवे, सचिव महेश टापरे उपस्थित होते.
आमदार संग्रामथोपटे यांनी भाटघर प्रकल्पग्रस्त ४२ गावांमधील सोयीसुविधांसाठी ७३ कोटी व वीर धरण प्रकल्पग्रस्त १९ गावांसाठी ३० कोटी रुपयांची मागणी केली. यामध्ये प्रकल्पग्रस्त गावांमध्ये क्रॉक्रीटचे रस्ते, पाणीपुरवठ्यासाठी शिवकालीन टाक्या, बंदीस्त गटारे, स्मशानभूमी, समाजमंदीर व ग्रामपंचायत कार्यालय शुशोभिकरण आणि वीज महावितरण आदी सुविधांचा समावेश आहे. त्यानंतर मंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्हिडीओ कॉन्फरंसींग व्दारे पुणे विभागाचे उपायुक्त श्रीमती सावरकर, जिल्हाधिकारी व प्रांताधिका-यांसह इतर विभागाच्या अधिका-यांशीही संपर्क साधून ३० कोटींच्या सोयींचा व विकासकामांचा प्राधान्यक्रम ठरवून प्रस्तावर सादर करण्याचे आदेश दिले.
याशिवाय प्रकल्पग्रस्त गावांमधील नागरिकांना खापरपणतूपर्यंतचे दाखले देण्यासाठी गावोगावी शिबीराचे आयोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच भोर तालुक्यातील कोंढरी व मुळशी तालुक्यातील घुटके या गावांचे माळीण गावच्या धर्तीवर पुर्नवसन करण्यासही मान्यता देण्यात आली. या ३० कोटींमुळे भाटघर व वीर प्रकल्पग्रस्त ६१ गावांमधील नागरी सुविधा पूर्ण होतील असा विश्वास आमदार संग्राम थोपटे यांनी व्यक्त केला. आमदार संग्राम थोपटे यांच्या विशेष प्रयत्नांमुळे प्रकल्पगावासांठी यापूर्वी १७ कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.