Sakal-Impact
Sakal-Impact

उड्डाण पुलासाठी तीस कोटी

सिंहगड रस्ता - सिंहगड रस्त्याची वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आवश्‍यक असणाऱ्या आनंदनगर उड्डाण पुलासाठी तीस कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. महापालिकेत सादर झालेल्या स्थायी समितीच्या अर्थसंकल्पात ही तरतूद करण्यात आली आहे.

सिंहगड रस्त्याची वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पर्यायी रस्त्यांसोबतच आनंदनगर चौकात उड्डाण पूल उभारण्यात यावा, अशी मागणी होत होती. याबाबत सकाळमध्ये बातमी प्रसिद्ध झाली होती. यापूर्वीच्या अर्थसंकल्पात दहा कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. मात्र, निधीचे विविध कामांसाठी वर्गीकरण करण्यात आले. दरम्यान, याभागातील नागरिकांची गरज लक्षात घेऊन यंदाच्या २०१९-२० च्या अंदाजपत्रकात राजाराम पूल चौक ते फनटाइमपर्यंत सुमारे दोन किलोमीटर अंतरासाठी प्रस्तावित उड्डाण पुलासाठी तीस कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या अंतरा दरम्यान इनामदार चौक, हिंगणे चौक, आनंदनगर चौक, माणिकबाग चौक आणि  माणिकबाग डीपी रस्ता असे चौक येतात. मात्र, पूल झाल्यामुळे वडगाव, धायरी, नऱ्हे, नांदेड, खडकवासला यासह पुढील भागातील सर्व वाहने या पुलावरून जातील, त्यामुळे मुख्य रस्त्यावरील कोंडी फुटण्यास मदत होईल.  

यासाठी आमदार माधुरी मिसाळ यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवक श्रीकांत जगताप, प्रसन्न जगताप, नगरसेविका ज्योती गोसावी आणि स्थायी समिती सदस्या नगरसेविका मंजूषा नागपुरे यांनी प्रयत्न केले. आज सादर झालेल्या अंदाजपत्रकात ही तरतूद करण्यात आली. 

या पुलामुळे वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मदत होणार आहे. दरम्यान पुलासाठी तरतूद झाल्याने नागरिकांमध्ये आनंद आणि समाधान व्यक्त होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com