esakal | बद्धकोष्ठता, मूळव्याधीच्या रुग्णांत 30 टक्के वाढ; दिवाळी फराळाचा परिणाम
sakal

बोलून बातमी शोधा

diwali-sweet

जीवनशैलीमुळे दिवाळी फराळाचा थेट परिणाम आणि आरोग्यावर होताना दिसतो. दिवाळीदरम्यान आणि त्यानंतर फराळाचे विविध पदार्थ आपल्या आहारात सहजतेने येतात.

बद्धकोष्ठता, मूळव्याधीच्या रुग्णांत 30 टक्के वाढ; दिवाळी फराळाचा परिणाम

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - दिवाळीच्या फराळाबरोबरच तुम्ही तंतुमय पदार्थ (फायबर) पुरेशा प्रमाणात आहारात घ्या. त्यामुळे तुमच्या पचनसंस्थेचे कार्य व्यवस्थित राहील, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे; अन्यथा बद्धकोष्ठता, फिशर (मूळव्याध) अशा आजारांचा धोका वाढत आहे. 

गेल्या आठवड्यात या आजाराच्या रुग्णांची संख्या 30 टक्‍क्‍यांनी वाढली आहे, असे निरीक्षणही त्यांनी नोंदविले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिवाळी आणि फराळ ही आपल्याकडे वर्षानुवर्षांची परंपरा आहे; पण बदलत्या जीवनशैलीमुळे दिवाळी फराळाचा थेट परिणाम आणि आरोग्यावर होताना दिसतो. दिवाळीदरम्यान आणि त्यानंतर फराळाचे विविध पदार्थ आपल्या आहारात सहजतेने येतात. त्यातून आता बद्धकोष्ठता, फिशरसारख्या आजारांच्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत असल्याचे निरीक्षण तज्ज्ञ डॉक्‍टरांनी नोंदविले आहे. 

ज्येष्ठ नागरिकांसाठी गुंतवणुकीचे सर्वोत्तम पर्याय

हिलिंग हॅंड क्‍लिनिकचे प्रोक्‍टोलॉजिस्ट डॉ. अश्विन पोरवाल म्हणाले, ""दिवाळीमधील फराळामुळे शरीरातील उष्णता वाढते. आहारात फराळाचा समावेश असल्याने फायबरचे प्रमाण कमी होते. त्यामुळे बद्धकोष्ठतेचे प्रमाण वाढण्याचा धोका असतो. त्यातून पुढे फिशर होण्याची शक्‍यता वाढते. मूळव्याधीचा त्रास असलेल्या रुग्णांवर याचा सर्वाधिक दुष्परिणाम होतो. त्यामुळे दिवाळीतील पदार्थ खाताना पुरेशा प्रमाणात पाणी प्या. त्याचबरोबर आहारात तंतुमय पदार्थ घ्या.'' 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

हे तीन "सी' आहारात असू द्या ! 
गाईचे दूध, गाईचे तूप आणि लिंबूवर्गीय फळे या "थ्री सी'चा रोजच्या आहारात समावेश करा. त्याचबरोबर गाजर, फळे पुरेशा प्रमाणात घ्या. त्यामुळे फराळाचा पचनसंस्थेवर होणारा दुष्परिणाम निश्‍चित कमी करता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त करा. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

हे तीन "पी' टाळा ! 
प्रक्रिया (प्रोसेस) केलेले, रॅपरमध्ये (पॅकेज) बंदीस्त असलेले आणि साठवून ठेवलेले (प्रिझर्व्ह) अन्नपदार्थ खाणे टाळा. प्रोसेस आणि पॅकेज अन्नपदार्थांमुळे बद्धकोष्ठतेबरोबर जळजळ होते. त्यातून पचनसंस्थेच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. 

गेल्या सात ते आठ दिवसांत तरुण वयातील मुला-मुलींमध्ये मूळव्याधीच्या रुग्णांची संख्या वेगाने वाढल्याचे दिसते. इतर आठवड्यांच्या तुलनेत गेल्या आठवड्यात या आजाराच्या रुग्णांची संख्या 30 टक्‍क्‍यांनी वाढली आहे. 
- डॉ. अश्विन पोरवाल, प्रोक्‍टोलॉजिस्ट, हिलिंग हॅंड क्‍लिनिक