पवना धरणात ३० टक्के पाणी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 मे 2017

पवनानगर - पवना धरणामध्ये ३० टक्के पाणीसाठा शिल्लक असून जुलैअखेर पाणी पुरेल एवढे पाणी शिल्लक असल्याची माहिती पवना धरण अभियंता मनोहर खाडे यांनी दिली.

पिंपरी-चिंचवडसह संपूर्ण मावळ तालुक्‍याची पाण्याची तहान भागविणाऱ्या पवना धरणामध्ये ३० टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. पवना धरण गेल्यावर्षी ८० टक्केच भरले होते. त्यातुलनेत यावर्षी चांगला पाऊस झाल्याने पवना धरणामध्ये शंभर टक्के पाणीसाठा झाला होता. त्यामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी धरणामध्ये पुरेसा पाणीसाठा शिल्लक असल्याने सध्यातरी पिण्याच्या व शेतीच्या पाण्याची काळजी मिटलेली आहे

Web Title: 30% water in pawana dam