आळंदी-दिघी मार्गावर 300 झाडांचे पुनर्रोपण 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 मे 2018

पिंपरी : आळंदी-पुणे पालखी मार्गाचे काळे कॉलनी ते दिघी या सुमारे आठ किलोमीटर रस्त्याचे रुंदीकरण महापालिकेने केले आहे. त्यासाठी अनेक झाडे काढावी लागली होती. त्यामुळे पालखी मार्ग ओसाड दिसत होता. मात्र, रुंदीकरणादरम्यान पुनर्रोपण केलेली सुमारे 300 झाडे आता बहरली आहेत. काही ठिकाणी पुनर्रोपण व वृक्षारोपण सुरू आहे. 

आळंदी-पुणे पालखी मार्गाचे तीन टप्प्यांत रुंदीकरणाचे काम सुरू आहे. दिघी ते वडमुखवाडीपर्यंत रुंदीकरण झालेले आहे. या दरम्यानचा बीआरटी मार्ग, मुख्य मार्ग आणि सेवा रस्ता रहदारीस खुला केला आहे. वडमुखवाडीपासून काळे कॉलनीपर्यंत काही जमीन अद्याप महापालिकेच्या ताब्यात नाही. त्यामुळे रस्त्याचे काम रखडलेले आहे. ताब्यात आलेल्या जमिनीच्या ठिकाणी रुंदीकरणाचे काम झालेले आहे. रुंदीकरणासाठी अडथळे ठरणारी झाडे चार-पाच वर्षांपूर्वी काढण्यात आली होती. त्यांचे पदपथ व दुभाजकांसह रस्त्याच्या कडेलाही पुनर्रोपण केलेले आहे. तसेच, नवीन झाडेही लावलेली आहेत. ती आता चांगलीच बहरली आहेत. काही ठिकाणी पुनर्रोपण व वृक्षारोपण सुरू आहे. 

पालखी मार्गावर आळंदी ते दिघीदरम्यान सुमारे 300 झाडांचे पुनर्रोपण केलेले आहे. सुमारे चारशे रोपे लावलेली आहेत. पावसाळ्यात सहाशे वृक्षारोपण करण्याचे नियोजन आहे. 
- सुरेश साळुंखे, मुख्य उद्यान अधीक्षक, महापालिका 
 
Web Title: 300 trees planting on alandi-digi darg