esakal | मिशन वंदे भारत झाले सक्सेस; काय आहे वाचा सविस्तर
sakal

बोलून बातमी शोधा

corona.jpg

कोरोनाच्या आपत्तीमुळे जगभरात विविध शहरांत अडलेल्या सुमारे 30 हजार भारतीयांना स्पाईस जेटने 200 चार्टर विमानांचा वापर केला आहे. मिशन वंदे भारततंर्गत या प्रवाशांना देशात आणून आपआपल्या गावी पोचविण्यात आले आहे. 

मिशन वंदे भारत झाले सक्सेस; काय आहे वाचा सविस्तर

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे ः कोरोनाच्या आपत्तीमुळे जगभरात विविध शहरांत अडलेल्या सुमारे 30 हजार भारतीयांना स्पाईस जेटने 200 चार्टर विमानांचा वापर करत आणले आहे. मिशन वंदे भारततंर्गत या प्रवाशांना देशात आणून आपआपल्या गावी पोचविण्यात आले आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनाच्या आपत्तीमुळे जगभरातील विमान वाहतूक सेवा बंद आहे. आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक सेवा 15 जुलैनंतर सुरू होण्याची शक्यता आहे. मात्र, जगभरात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी केंद्र सरकारने मिशन वंद भारत सुरू केले. त्यात स्पाईस जेटने मोलाचा वाटा उचलला आहे. 

स्पाईस जेटने संयुक्त अरब अमिरतीमधून 111 विमानांच्या फेऱयांद्वारे 20 हजार भारतीयांना परत आणले आहे. तसेच आेमान, लेबनॉन, कतार, श्रीलंका येथून 50 विमानांच्या फेऱयांद्वारे 10 हजार भारतीयांना परत आणले आहे. तसेच 1 जून पासून 25 मे पासून देशांर्तगत विमानसेवा सुरू झाली असून त्यातही स्पाईस जेटकडून प्रवाशांची वाहतूक सुरू आहे. 

या बाबत स्पाईस जेटचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अजयसिंग म्हणाले, कोरोनाच्या आपत्तीच्या काळात विविध देशांत अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यात स्पाईस जेटने मोलाचा वाटा उचलला, याचा आम्हाला अभिमान आहे. देशातील प्रवाशांनाही एका शहरातून दुसऱया शहरात पोचविण्यात आम्हाला चांगले यश आले आहे. कोरोनाचा लॉकडाउन देशात 25 मार्चपासून सुरू झाला. त्या दिवसापासून स्पाईस जेटने कार्गोमार्फत 20 हजार टन मालाची वाहतूक केली आहे. औषधे, पूरक साहित्य व वैद्यकीय उपकरणे, फळे, भाजीपाला आदींची देशात आणि परदेशातही वाहतूक केली आहे. जगात सुमारे 30 देशांत स्पाईस जेटचे कार्गो नेटवर्क आहे, असेही त्यांनी सांगितले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

स्पाईस जेटने प्रवासी विमानांतूनही 7 एप्रिलपासून माल वाहतूक केली असून, अशा प्रकारे माल वाहतूक करणारी आमची देशातील पहिलीच विमान कंपनी आहे, असेही अजयसिंग यांनी सांगितले. 

loading image
go to top