esakal | पुणेकरांनो, आतातरी भानावर या; मृतांच्या आकड्याने ओलांडलाय १ हजाराचा टप्पा!
sakal

बोलून बातमी शोधा

Corona-Death

कोरोना एवढ्यावरच थांबला नाही, तर दिवसभरात ५९१ रुग्णांना अत्यावस्थ केले असून, त्यापैकीचे ९६ जण 'व्हेटिलेंटर'वर ठेवले आहेत. त्यामुळे अुपऱ्या आरोग्य यंत्रणेपुढे कोरोना मृतांचे बलाढ्य संकट उभे ठाकले आहे.

पुणेकरांनो, आतातरी भानावर या; मृतांच्या आकड्याने ओलांडलाय १ हजाराचा टप्पा!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुण्यात कोरोनाने हाहाकार माजवत रविवारच्या काही तासांत ४४ जणांचा श्‍वास रोखल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी (ता.२०) पुन्हा ३१ जणांचा जीव घेतला. त्यामुळे मृतांच्या एकूण आकड्याने एक हजाराचा टप्पा ओलांडला आहे.

कोरोना एवढ्यावरच थांबला नाही, तर दिवसभरात ५९१ रुग्णांना अत्यावस्थ केले असून, त्यापैकीचे ९६ जण 'व्हेटिलेंटर'वर ठेवले आहेत. त्यामुळे अुपऱ्या आरोग्य यंत्रणेपुढे कोरोना मृतांचे बलाढ्य संकट उभे ठाकले आहे. गंभीर बाब म्हणजे, पुढच्या काही दिवसांत मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीतीही आरोग्य खात्याने व्यक्त केली आहे. परिणामी, मृतांची रोजची संख्या ऐकून पुणेकरांच्या पोटात गोळा येत आहे. 

पुणे व्यापारी महासंघाने मुख्यमंत्र्यांना पाठवलं पत्र; काय केली मागणी पाहा!

एवढ्या प्रमाणात मृत्यू होत असतानाच सोमवारी दिवसभरात नवे १ हजार ८७१ रुग्ण सापडले आहेत. तर ८३० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मात्र ५९१ रुग्णांची प्रकृती ही गंभीर असल्याचेही आकडे आहेत. मृतांमध्ये २१ पुरुष आणि दहा महिलांचा समावेश आहे. त्यांचे वय साधारपणे ४०, ५० आणि ६० वर्षांपेक्षा अधिक आहे. मृतांना कोरोनासोबत हृदयरोग, अवस्था, मधुमेह, मूत्रपिंडसारख्या आजार असल्याचे निष्पन्न झाले आहे. 

राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून भाजपला प्रत्युत्तर; अजित पवारांवरील टीकेची केली परतफेड!​

कोरोना संसर्ग वाढल्याने रोज सरासरी दीड हजार नवे रुग्ण सापडत असल्याने पुणेकरांत मोठी भीती आहे. त्याचवेळी मात्र गेल्या तीन-चार दिवसांपासून मृतांची संख्या वाढत आहे. आतापर्यंत सर्वाधिक २५ मृत झाल्याचे ऐकूण असलेल्या पुणेकरांपुढे रविवारी अचानक ४४ आकडा. त्यानंतर सोमवारी पुन्हा ३१ जणांचा मृत्यू झाल्याचा अहवाल आला आहे. शिवाजीनगर, वडगावशेरी, कल्याणीनगर, कसबा पेठ, वारजे माळवाडी, टिंगरेनगर, येरवडा, हडपसर, धनकवडी, मुंढवा, कोंढवा, विश्रांतवाडी, लोहगाव, नारायण पेठ, बिबवेवाडी या भागांतील रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

काय करावं या पुणेकरांचं? सगळं बंद तरीही रस्त्यावर वर्दळ सुरूच!​

शहरात आतापर्यंत २ लाख ९ हजार २२ नागरिकांची तपासणी झाली असून, त्यापैकीच्या ३९ हजार २०३ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. मात्र त्यातील २३ हजार ४४१ रुग्ण बरे झाले आहेत. त्यातील १ हजार रुग्णांचा मृत्यू झाला असून सध्या १४ हजार ७५७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

महापालिकेचे सहायक आरोग्य प्रमुख म्हणाले, "तपासणी वाढविल्याने रुग्ण संख्या वाढत आहेत. त्याप्रमाणात अत्यवस्थ रुग्णही आढळून येत आहेत. त्यातील विशेषत: साठीच्या पुढच्या आणि अन्य आजार असलेल्या रुग्णांचा मृत्यू होत आहे. मृतांमध्ये ३५ वर्षांपुढच्या रुग्णांचा समावेश आहे.''

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

loading image