सासवडला 32 जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा संपन्न

saswad
saswad

सासवड : राज्यमंत्री विजय शिवतारे मित्रमंडळ, पुरंदर – हवेली.. यांच्यातर्फे यंदाही 13 व्या वर्षीही 32 जोडप्यांचा कऱहेकाठी सामुदायिक विवाह सोहळा संपन्न झाला. काल रविवारी (ता. 12) रात्री सासवडच्या पालखी मैदानावर या उपक्रमात सर्व जातीधर्माच्या विवाह इच्छुक वधू - वरांचा विवाह मोठ्या थाटामाटात झाला. 

यावेळी खासदार शिवाजी आढळराव, राज्यमंत्री विजय शिवतारे, आमदार राहुल कुल, शिवतारे मंडळाचे उपाध्यक्ष रावसाहेब पवार, सचिव दिलीप यादव, पं.स.सभापती अर्चना जाधव, उपसभापती दत्ता काळे, रमेश कोंडे, राजेंद्र काळे, गिरीष जगताप, राजेंद्र जगताप, शालीनी पवार, ज्योती झेंडे, अतुल म्हस्के आदी अनेक मान्यवर व वऱहाडी, नागरीक उपस्थित होते. 

येथे सामुदायिक विवाह सोहळ्याची चळवळ उभी करताना 29 मार्च 2008 मध्ये मंडळाचे अध्यक्ष तथा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी स्वतःचा मुलगा विनय याच्यासह 141 जोडप्यांचे संसार उभे करत शाही `सामुदायिक विवाह सोहळा` उपक्रमाचा प्रारंभ केला होता. शेतकऱ्यांनी मुलामुलींच्या लग्नासाठी कर्ज काढू नये आणि बँका, पतसंस्था किंवा सावकारांच्या कठोर वसुलीस त्यांना तोंड द्यावे लागू नये, यासाठी नैतिक जबाबदारी व कर्तव्य समजून या उपक्रमास सुरुवात केली होती. त्याच पध्दतीने यंदा सहभागी नवदांपत्यास मणी मंगळसूत्र, हळदीची साडी, लग्नाचा शालू, नवरदेवाचे कपडे, संसारोपयोगी भांडी, मनगटी घड्याळ, बूट - चप्पल तसेच अन्य वस्तू यंदाही दिल्या. सर्व वऱ्हाडी मंडळींना दुपारी चारपर्यंत सुग्रास जेवणाची मेजवानी होती. या विवाह सोहळ्यातील सर्व वधू - वरांस शुभाशीर्वाद देण्यासाठी दादा महाराज यांच्यासह समाजाच्या विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना शिवतारे म्हणाले, समाजात एक नवा संदेश जावा, गोरगरीबांचे जीवन सुखकर व्हावे, सामुहिक विवाह सोहळ्यास प्रतिष्ठा मिळावी यासाठी हा उपक्रम पुढेही सुरु राहील. तर खा. आढळराव यांनी उपक्रमाबद्दल शिवतारे यांचे कौतुक केले. 

अशी झाली 26.76 कोटींची बचत.. 
सध्याच्या महागाईत बऱयापैकी विवाह केला, तरी दोन्हीकडील कुटुंबाचे मिळून कमीत कमी तीन ते चार लाख रुपये खर्च होतात. या हिशेबाने.. आतापर्यंत राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या प्रयत्नाने 13 वर्षात झालेल्या 1,784 वधू व वरांच्या कुटुंबांचे म्हणजेच सुमारे 892 जोडप्यांच्या विवाहात सुमारे 26.76 कोटी रुपयांची समाजाची बचत केली., असे शिवसेनेचे पदाधिकारी व तालुका पं.स.चे माजी सभापती अतुल म्हस्के म्हणाले.  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com