Rohit Pawar : ४०० पार चा नारा बूमरँग होऊन भाजपवर उलटणार; महाविकास आघाडीचे ३२ खासदार निवडून येणार

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारानिमित्त राज्याच्या अनेक भागांमध्ये मी सध्या फिरत आहे. सारीकडेच वातावरण भाजपच्या व त्यांच्या मित्र पक्षांच्या विरोधात आहे. ज्या पद्धतीने यापूर्वी भाजपचा शायनिंग इंडियाचा नारा बूमरँग होऊन त्यांच्यावर उलटला होता.
Rohit Pawar
Rohit Pawarsakal

काटेवाडी : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारानिमित्त राज्याच्या अनेक भागांमध्ये मी सध्या फिरत आहे. सारीकडेच वातावरण भाजपच्या व त्यांच्या मित्र पक्षांच्या विरोधात आहे. ज्या पद्धतीने यापूर्वी भाजपचा शायनिंग इंडियाचा नारा बूमरँग होऊन त्यांच्यावर उलटला होता. त्याच पद्धतीने आताचा ४०० पर चा नारा त्यांच्यावर उलटणार आहे. या लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे ३२ खासदार निवडून येतील तर भाजपा २०० पार सुद्धा होणार नाही असा दावा आमदार रोहित पवार यांनी केला आहे.

कन्हेरी इथे मारुती मंदिर परिसरात शनिवारी (ता. १३) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारानिमित्त संवाद दौरा आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना करताना आमदार रोहित पवार पुढे म्हणाले, भाजप अडचणीमध्ये पुरता अडकला आहे.

Rohit Pawar
Loksabha Election 2024 : ‘बसप’चे ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ ; हक्काच्या मतपेढीसाठी ‘यूपी’त हत्तीने चाल बदलली

या अडचणी मधून स्वतःची सोडवणूक करण्यासाठी त्यांनी आधी शिवसेना फोडली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस देखील फोडली. यावर देखील त्यांचे समाधान होत नसल्याने एक आमदार असणारा मनसे पक्ष देखील सोबत घेतला. या प्रकारावरूनच तुम्हाला वातावरण कसं आहे ते कळेल. बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये कार्यकर्ते, पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य जे आमच्या बाजूने फिरतील त्यांना धमक्या दिल्या जात आहेत. त्यांच्यावर दबाव टाकला जात आहेत.

मात्र या दबावाला आपण बळी पडायचे नाही. तुतारी खणखणीत वाजवायची आहे. माझ्यावर काय कमी दबाव टाकला का? असा सवाल करत आमदार रोहित पवार पुढे म्हणाले, दहा हजार कुटुंब ज्या कंपनीवर अवलंबून आहेत त्या कंपनीची ईडी कडून चौकशी सुरू केली. हर प्रकारे अडकवण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र मी या दबावाला बळी पडलो नाही. माझ्या कंपनीतील कामगारांनीच मला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आपल्यावर येणारा दबाव जुगारून द्या. असे आवाहन आमदार रोहित पवार यांनी केले.

दडपशाहीचे राजकारण चालणार नाही....

आमदार रोहित पवार यांचे भाषण सुरू असताना सिद्धेश्वर निंबोडी येथील काही कार्यकर्ते व पदाधिकारी मध्येच उठून उभे राहिले. दादा आमच्या भागातील पाणी बंद केले आहे आम्ही तुतारीचा प्रचार करतो म्हणून आम्हाला पाणी दिले जात नाही. आजूबाजूच्या भागात पाणी दिले जाते, अशी तक्रार त्यांनी रोहित पवार यांच्यापुढे मांडली. यावर रोहित पवार यांनी हे दडपशाहीचे राजकारण चालणार नाही. तुम्हाला पाणी दिलेच पाहिजे. या पद्धतीचे राजकारण आपण खपवून घेणार आहोत का असा सवाल यावेळी केला.

धमक्यांचे रेकॉर्डिंग माझ्याकडे पाठवा....

सुप्रिया ताईंना कमीत कमी साडेतीन लाखांचे मताधिक्य मिळणार आहे, असा दावा करत आमदार रोहित पवार म्हणाले. तुम्हाला जर धमक्यांचे फोन येत असतील तर ते रेकॉर्ड करा. कोणी घरी येऊन धमकवत असेल तर त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करा. व ते आमच्या पर्यंत पोहोचवा आम्ही बघू त्याचे काय करायचे ते, असेही यावेळी रोहित पवार म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com