राज्यात नव्वद दिवसांत ३३ कोटी वृक्षारोपण करण्यात येणार : सुधीर मुनगंटीवार

DSC_5259-1.jpg
DSC_5259-1.jpg

पुणे : राज्यात यंदा ३३ कोटी वृक्षांचे उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी वन विभागांबरोबर वनेतर जमिनीवर वृक्ष लावण्याची आखणी करीत आहोत. नव्वद दिवसांत ३३ कोटी वृक्षारोपण करण्यात येणार असून, या मोहिमेमुळे महाराष्ट्राला वनीकरण क्षेत्रात देशात आघाडी घेण्याची संधी मिळाली असल्याचे मत राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले.

गोखलेनगरमधील मेंढी फार्म येथे आमदार विजय काळे यांच्रूा संकल्पनेतून विकसित करण्यात आलेल्या भांबुर्डा वनउद्यानाचे लोकार्पण करताना श्री. मुनगंटीवार बोलत होते. आमदार विजय काळे अध्यक्षस्थानी होते. महापौर मुक्ता टिळक, नगरसेवक आदीत्य माळवे, प्रकाश ढोरे, विजय शेवाळे, धीरज घाटे, नीलीमा खाडे, माधुरी सहस्रबुद्धे, ज्योत्स्ना एकबोटे, सुरेश कांबळे, मु‘य वनसंरक्षक विवेक खांडेकर, उपवनसंरक्षक श्रीलक्ष्मी ऐ, यांची प्रमुख उपस्थिती होती.  

श्री. मुनगंटीवार पुढे म्हणाले, ‘निसर्ग उत्तम ठेवला तर सर्व प्रश्‍नांची उत्तरे मिळू शकतात. सर्व प्रश्‍नांचे मूळ वृक्ष लागवडीत आहे. त्यासाठी आम्ही विविध प्रयोग करीत आहोत आपण कोणत्या पदावर काम करतो हे महत्त्वाचे नाही. काम पूर्ण करण्यासाठी किती पाठपुरावा केला हे महत्त्वाचे असते. 

आमदार काळे म्हणाले, ‘भांबुर्डा वनउद्यानासाठी आणखी दोन कोटी रुपयांचा निधी आणि शिवाजीनगर मतदारसंघातील तीन ठिकाणी पाण्याच्या टाक्यांसाठी वन विभागाची जागा उपलब्ध करून देणार आहोत.’

आमदार विजय काळे म्हणाले, ‘गोखलेनगर, शिवाजीनगर, कोथरुड आदी परिसरातील नागरिकांना व्यायाम व फीरण्यासाठी हे उद्यान उपयुक्त ठरेल. या ठिकाणी निसर्गातील प्राणी, पक्षी, वृक्षसंपदा, विविध वृक्षांचे महत्त्व, पर्यावरण या विषयीची माहिती नागरिक व विद्यार्थ्यांना मिळू शकेल. उद्यानाचा दुसरा टप्प पूर्ण करण्यासाठी दोन कोटी रुपये निधीची आवश्यकता आहे. त्यासाठी पाठपुरावा करणार आहे.’

ते पुढे म्हणाले, ‘समान पाणीपुरवठा योजनेतील तीन टाक्यांसाठी वन विभागाची परवानगी आवश्यक आहे. तसेच मुस्लिम बांधवांच्या मागणीनुसार या भागात दफभूमीसाठी जमीन देण्याचा प्रस्ताव वन विभागाकडे पंधरा वर्षांपासून प्रलंबित आहे. त्याला वन विभागाने मान्यता द्यावी. महापौर मुक्ता टिळक, नगरसेवक आदीत्य माळवे,  विवेक खांडेकर यांची भाषणे झाली.

मॅङ्गको कंपनीच्या चौदा एकर जागेवर विकसित केलेले हे शहरातील सर्वाधिक क्षेत्रङ्गळ असणारे उद्यान आहे. आयुष वन, लुप्त होणार्‍या प्रजातींचे वन, गणेश वन, सुगंधी वन, नवग‘ह वन, पंचवटी वन, औषधी वन, नक्षत्र वन, ङ्गळ उद्यान, वड जातींच्या वृक्षांचे उद्यान, पाम उद्यान, उपयुक्त प्रजातींचे उद्यान, स्मृती वन, बांबू वन, किचन बाग अशी विविध प्रकारची १४ वने एकाच ठिकाणी विकसित करण्यात आली आहेत. चौदा हजार वृक्ष व वेलींंची लागवड करण्यात आली आहे. 

निसर्ग परिचय केंद्र, पर्यावरण उपक‘मांसाठी खुले सभागृह, साहसी खेळ, मैदानी खेळ, खेळांचे साहित्य, प्राण्यांच्या प्रतिकृती, मतिमंद विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र विभाग, खुली व्यायामशाळा, योग केंद्र, फिरण्यासाठी निसर्ग पाऊलवाटा, बसण्यासाठी कठडे व मनोरे, वनतलाव, ओढे, नाले यांना दगडी पिचिंग करून नागरिकांना पाणी अडविण्याचे महत्त्व नागरिकांना कळावे यासाठी गॅबियन वॉल, लाकडी आभासाचे पूल, भव्य प्रवेशद्वार, आकर्षक भित्तीचित्रे, रंगीबेरंगी ङ्गुले, विविध प्रकारचे गुलाब, मनमोहक धबधबा, सुंदर प्रकाश व्यवस्था, नैसर्गिकपणे केलेली सजावट ही उद्यानाची वैशिष्ट्ये आहेत. 

भांबुर्डा वन विभागातील ही जागा पूर्वी मॅङ्गको कंपनीला भाडेतत्त्वावर देण्यात आली होती. कंपनीचा करार संपल्यानंतर हे क्षेत्र ओसाड झाले होते. मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला होता. विविध शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, अनिरुद्ध उपासना केंद्राचे स्वयंसेवक यांनी स्वच्छता, वृक्षलागवड, रोपांना पाणी देणे अशी मदत सातत्याने केली. आमदार विजय काळे यांच्या संकल्पनेतून उभारलेले हे उद्यान निर्माण करण्यासाठी एक कोटी ७२ लाख रुपये खर्च झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com