पुण्याच्या सदाशिव पेठेतील 'ते' ३३ रूग्ण बरे; संपर्कात आलेल्यांना शोधणे ठरतेय अवघड

33 patients infected with coronaVirus in Pune Sadashiv Peth are cured.jpg
33 patients infected with coronaVirus in Pune Sadashiv Peth are cured.jpg

पुणे : एकीकडे अवघे पुणे शहर कोरोनाच्या दहशतीखाली वावरत असताना, कोरोनाच्या एन्ट्री'नंतर तब्बल दोन महिने निर्धास्त राहिलेल्या सदाशिव पेठेत शनिवारी एकाच दिवसांत एकाच दुकानात ३३ कोरोना रुग्ण सापडले आणि सदाशिव पेठ पुरती गोंधळली आणि आता प्रचंड घाबरलीही. पण या सर्व ३३ रुग्णांवर बिबवेवाडीतील राव  हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. सगळ्यांची प्रकृती बरी आहे. हे सारे रुग्ण बरे असले तरी, ते गेल्या आठवड्यात नेमके कुठे फिरले ? तेव्हा, त्यांच्या संपर्कात किती आणि कुठचे लोक आले, याचा शोध मात्र महापालिकेला डोकेदुखी ठरत आहे.
दरम्यान, या रुग्णांना दाखल केलेल्या राव हाॅसिपटलशी  महापालिकेचा करार करण्यात आला आहे. त्यामुळे उपचारांत कमतरता राहणार नाही, असे महापालिकेच्या आरोग्य खात्याने स्पष्ट केले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे
 ► क्लिक करा

सदाशिव पेठेतील घाऊक औषधांच्या एका दुकानातील ३३ कामगारांना शनिवारी कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आधीच झपाट्याने रुग्ण वाढत असताना ज्या भागात म्हणजे, सदाशिव पेठेत गेल्या सव्वादोन महिन्यांत एकही रुग्ण सापडला नाही, त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात रूग्ण आढळून आल्याने सदाशिव पेठेसह संपूर्ण शहरात घबराट उडाली. त्याआधी बुधवारीच या बाजारपेठेतील तिघांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले होतो. त्यामुळे ही बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती. त्यानंतर मात्र ३३ रुग्ण सापडल्याने घबराट पसरली आणि निर्धास्त सदाशिव पेठेतील रहिवासी धास्तावले. त्यानंतर संबंधित दुकानाला टाळे ठोकून मालकासह सर्व रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

पुण्यातल्या `त्या` भीती वाटणाऱ्या जागा अन् कीर्ररररर....शांतता!

बिबवेवाडीतील राव रूग्णालयात दाखल केले आहे. रुग्णांमध्ये २२ ते ४० वयोगटातील व्यक्तींचा समावेश आहे. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे, हे कामगार गेल्या काही दिवसांपासून औषधांची विक्री करीत होते. शहराच्या विविध भागांतील किरकोळ विक्रेत्यांकडे त्यांना माल पोहचविला आहे. मात्र, ते कुठे आणि कशा पध्दतीने फिरत होते, हे महापालिकेला कळेनासे झाले आहे. त्यामुळे या लोकांच्या संपर्कातील नागरिकांच्या शोध कुठे घ्यायचा? ही मोठी अडचणी महापालिकेपुढे तास तरी आहे.

अरे बापरे ! मार्केट यार्डात पुणेकरांची झुंबड; सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा       

मालिकेचे सहायक आरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे म्हणाले, "औषधांच्या दुकानातील सर्व रूगण आहेत. त्यांच्यायर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
त्यांच्या सपकातील लोकांचीही तपासणी करीत आहोत. "

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com