इंदापूर तालुक्यामधील ३३ शाळा सुरू

राजकुमार थोरात
Monday, 23 November 2020

 इंदापूर तालुक्यामध्ये इयत्ता ९ ते १२ वी पर्यंतच्या ३३ शाळा सुरु झाल्या असून पहिल्या दिवशी १३८८ विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये हजेरी लावली असल्याची माहिती प्रभारी गटशिक्षणधिकारी राजकुमार बामणे यांनी दिली. 

वालचंदनगर : इंदापूर तालुक्यामध्ये इयत्ता ९ ते १२ वी पर्यंतच्या ३३ शाळा सुरु झाल्या असून पहिल्या दिवशी १३८८ विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये हजेरी लावली असल्याची माहिती प्रभारी गटशिक्षणधिकारी राजकुमार बामणे यांनी दिली.  अनावश्यक वादात चंद्रकांत पाटील यांना ओढणं चुकीचं!​

इंदापूर तालुक्यामध्ये १०४ शाळा आहेत. यातील ३३ शाळा पहिल्या दिवशी सुरु झाल्या असून १३८८ विद्यार्थ्यांनी हजेरी लावली.   तालुक्यामध्ये १०४ शाळेमध्ये १८६१० विद्यार्थी आहे. शाळा सुरु करण्यापूर्वी संपूर्ण शाळेचा परीसर सॅनिटायझेशन करण्यात आला होता. तसेच शिक्षकांची कोरोना चाचणी पूर्ण होवून अहवाल आलेल्या शाळांनी शाळा सुरु केल्या आहेत.

आठ महिन्यानंतर शाळा सुरु झाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरती हास्य होते. मास्क लावून मुले-मुली शाळेमध्ये हजर झाली. आज पहिल्या दिवशी शाळेमध्ये सर्व विद्यार्थी हजर नव्हते. एका वर्गामध्ये पाच ते दहा विद्यार्थ्यांनी  हजेरी लावली.

 'मला चंपा म्हणता, ते चालतं का? चंद्रकांत पाटलांचा राष्ट्रवादीला सवाल​

विद्यार्थ्यांचा ताप थर्मामिटरच्या साहय्याने व रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण तपासणी करुन विद्यार्थ्यांना वर्गामध्ये बसविण्यात आले. तसेच प्रत्येक विद्यार्थ्याच्या  पालकांचे हमीपत्रही घेणण्यात आले. इंदापूर तालुक्यामध्ये माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांची संख्या १३५६ असून ७३१ शिक्षकांची कोरोनाची चाचणी पूर्ण झाली आहे.उर्वरित शिक्षकांची कोरोना चाचणी स्वॅब घेण्याचे काम सुरु  आहे. 

(संपादन : सागर डी. शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 33 schools started in Indapur taluka