लोकअदालतीत ३३ हजार दावे निकाली

तडजोड झालेल्या दाव्यांत पक्षकारांना ४५ कोटी ३९ लाख ८५ हजार ३२३ रुपये मिळणार आहे.
file photo
file photosakal

पुणे : पक्षकारांना जलद न्याय मिळावा यासाठी आयोजित करण्यात आलेल्या लोकअदालतीमध्ये (Lok Adalat) दाखलपूर्व आणि प्रलंबित असे ३३ हजार ६१ दावे निकाली काढण्यात पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाला (Pune District Legal Services Authority) यश आले आहे. तडजोड झालेल्या दाव्यांत पक्षकारांना ४५ कोटी ३९ लाख ८५ हजार ३२३ रुपये नुकसान भरपार्इ मिळणार आहे. रविवारी झालेल्या लोकअदालतीत एकूण ८१ हजार२०० दावे तडजोडीसाठी ठेवण्यात आले. (33,000 claims settled in Lok Adalat)

या वर्षातील ही पहिलीच लोकअदालत आहे. कोरोनाच्या परिस्थितीत पक्षकारांना बाहेरगावहून प्रत्यक्ष उपस्थित राहाणे शक्य होणार नाही नव्हते. त्यामुळे प्रत्यक्ष आणि ऑनलाइन अशा दोन्हीद्वारे पक्षकारांना सहभागी करून घेत त्यांना बाजू मांडण्याची संधी देण्यात आली होती. त्यासाठी प्रमुख जिल्हा न्यायाधीश एस. ए. देशमुख यांच्या मार्गदर्शनानुसार ४५ पॅनेल तयार करण्यात आली होते.

file photo
अनलॉकची नवी नियमावली जाहीर; हॉटेल चालकांना दिलासा नाहीच!

या लोकअदालतीमध्ये दाखलपूर्व आणि प्रलंबित दाव्यांमध्ये भूसंपादन, धनादेश न वटणे, अपघात न्यायप्राधिकरण, वीजबिल, पाणीपट्टी, मालक आणि नोकर वाद, महसूल, तडजोड, योग्य दिवाणी आणि फौजदारी दाव्यांचा समावेश होता. यात दाखलपूर्व ४८ हजार ६८० दावे तडजोडीसाठी ठेवण्यात आले होते. त्यातील १७ हजार ६८० दावे निकाली काढण्यात आले. तर ३२ हजार ५२० प्रलंबित दावे ठेवण्यात आले. त्यातील १५ हजार ५६२ दावे निकाली काढण्यात आले.

कोरोना किंवा अडचणीच्या काळात घरातील व्यक्ती, नातेवार्इक किंवा इतर जवळच्या व्यक्ती बरोबर असणे महत्त्वाचे आहे. ही बाब लक्षात आल्याने दावे तडजोडीमधून निकाली काढण्यासाठी अनेकांनी पुढाकार घेतला. त्यामुळे यंदा लोकअदालतीला पक्षकारांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

- प्रताप सावंत, सचिव, पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण

file photo
रखडलेली पोलीस भरती लवकरच सुरू होणार

तृतीयपंथी प्रेरणा वाघेलाला मिळाली न्यायदानाची संधी

तृतीयपंथीयांच्या हक्कांसाठी लढत असलेल्या प्रेरणा वाघेला यांनी लोक अदालतमध्ये न्यायदानाची जबाबदारी पार पाडली. पॅनेल सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. वाघेला यांच्या रूपाने प्रथमच एका तृतीयपंथी व्यक्तीला लोकअदालतीत न्यायदानाची संधी मिळाली आहे. पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे जिल्ह्यातील सर्व न्यायालयात लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. त्या अंतर्गत शिवाजीनगर जिल्हा न्यायालयात न्यायाधीश एस. आर. पाटील यांच्या पॅनेलमध्ये डॉ. मनिका कामठान यांच्यासह प्रेरणा यांची पॅनेल सदस्य म्हणून निवड करण्यात आली होती.

प्रेरणा वाघेला यांनी ‘एमए’, ‘एमएड’चे शिक्षण घेतले आहे. सध्या त्या पुणेरी प्राइड फाउंडेशनच्या संचालिका आहेत. तृतीयपंथी व्यक्तींच्या आयुष्यात परिवर्तन घडविणे, त्यांना उपजीविकेच्या संधी उपलब्ध करून देणे, त्यासाठी त्यांचा कौशल्य विकास करणे या उद्देशातून ही संस्था पुण्यासह राज्यभरात कार्यरत आहेत. त्या आधारे त्यांची लोकअदालतीत पॅनेलमध्ये नियुक्ती करण्यात आली.

file photo
पूजा चव्हाणशी झालेल्या संभाषणामधील 'तो' आवाज संजय राठोड यांचाच!

याबाबत प्रेरणा यांनी सांगितले की, समाजाचा आमच्या समुदायाकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्वग्रहदूषित आहे. लोकअदालतीत पॅनेल सदस्य म्हणून काम केल्याने हा दृष्टिकोन बदलेल. या प्रेरणेतून मी लोकअदालतीच्या कामकाजात सहभाग घेतला. प्रमुख जिल्हा न्यायाधीश एस. ए. देशमुख आणि पुणे जिल्हा विधी प्राधिकरणाचे सचिव प्रताप सावंत यांनीही मला प्रोत्साहन दिले.

माझी पॅनेल सदस्य म्हणून निवड झाल्याने तृतीयपंथी समुदायाला ओळख मिळाली आहे. तृतीयपंथीयांमध्ये नेतृत्वक्षमता आहे. लोकअदालतीप्रमाणेच त्यांना विविध व्यासपीठांवर प्रतिनिधित्व मिळत राहिल्यास, कदाचित तृतीयपंथी समुदायाकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल.

- प्रेरणा वाघेला, लोकअदालत पॅनेल सदस्य

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com