पुणे - जुन्या सांगवीतील चेंबरची ३५ लोखंडी झाकणे चोरीला

रमेश मोरे
गुरुवार, 5 जुलै 2018

जुनी सांगवी (पुणे) : जुनी सांगवी अंतर्गत रस्त्यावरील भुमिगत सांडपाणी वाहिन्यांच्या चेंबर वरील ३५ लोखंडी झाकणे गायब झाल्याने अखेर स्थापत्य विभागाने याच्या चौकशीसाठी सांगवी पोलिसात धाव घेत लोखंडी झाकणे गायब झाल्याची अज्ञाताविरूद्ध तक्रार दाखल केली आहे.

गेली पंधराविस दिवसांपासुन येथील प्रियदर्शनी नगर, पी.डब्ल्यु.डी.वसाहत रस्ता, वेताळ महाराज मंदीर रस्ता, आदी ठिकाणची चेंबरवरील लोखंडी झाकणे गायब झाली आहेत. उघड्या चेंबरमुळे या सर्व ठिकाणी उघडे चेंबर लक्षात न आल्याने किरकोळ अपघात घडले आहेत. याबाबत मनसेचे राजु सावळे यांनी  स्थापत्य विभागाकडे तक्रार निवेदन दिले होते.

स्थापत्य विभागाकडुन यानंतर परिस्थितीची पाहणी केल्यावर ठिकठिकाणचे ३५ चेंबर उघडे असल्याचे लक्षात आले.याबाबत सकाळ मधुन गुरूवार ता.५ बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती. उघड्या चेंबरवर स्थापत्य विभागाकडुन आता लोखंडी जाळी ऐवेजी आरसीसी सिंमेंटची झाकणे बसविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. गायब झालेल्या लोखंडी झाकणाबाबत स्थापत्य कनिष्ठ अभियंता सचिन सानप यांनी सांगवी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

आम्ही बसवलेली लोखंडी झाकणे गायब होण्याचे प्रकार वाढले आहेत. नागरीकांनी यावर लक्ष ठेवुन सहकार्य करावे.
- शिरिष पोरेडी- अभियंता स्थापत्य "ह" प्रभाग

अशा घटनांमुळे अचानक एखादा अपघात घडु शकतो.अशा घटनांना वेळीच आळा घातला पाहिजे.
- संतोष कांबळे- नगरसेवक 

Web Title: 35 door of chambers stole in old sangavi pune