पस्तीस लाखांचे परकी चलन जप्त

Crime-Scene
Crime-Scene

पुणे - दुबईच्या विमानातून प्रवास करणाऱ्या दोघांना बेकायदा परकी चलन बाळगल्याप्रकरणी सीमाशुल्क विभागाच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून सौदी अरेबियाचे रियाल या चलनाच्या 35 लाख 41 हजार रुपये किमतीच्या नोटा जप्त केल्या आहेत.

बालाजी मुस्तापुरे व मयूर भास्कर पाटील, अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. सीमाशुल्क विभागाच्या सहआयुक्त वैशाली पतंगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्पाइस जेटच्या दुबईहून आलेल्या विमानातून दोन प्रवाशांकडे परकी चलनाची तस्करी केलेली रक्कम असल्याची खबर मिळाली होती. त्यानुसार मंगळवारी लोहगाव विमानतळावर दाखल झालेल्या विमान प्रवाशांची सीमाशुल्क विभागाचे अधिकारी अंगझडती व त्यांच्या बॅगची तपासणी करीत होते. त्या वेळी मुस्तापुरे व पाटीलच्या बॅगमध्ये सौदी अरेबियाचे रियाल हे चलन आढळून आले. पतंगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त उषा भोयर, विनिता पुसदेकर, संजय झरेकर यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

165 किलो गांजा जप्त
सीमाशुल्क विभागाच्या अमली पदार्थविरोधी पथकास बुधवारी नगर-कल्याण महामार्गावरील आळेफाट्याजवळ असलेल्या डोंबारवाडी टोल नाक्‍याजवळ एक इनोव्हा गाडी (एमएच 05, डीक्‍यू 1214) गांजा घेऊन जात असल्याची खबर मिळाली होती. पथकाने संबंधित ठिकाणी सापळा रचून गाडी ताब्यात घेतली. त्या वेळी त्यामध्ये 165 किलो वजनाची सात गांजाची पोती आढळून आली. याप्रकरणी अंकुश भीमराव पाडुळे (रा. आष्टी, बीड) व नितीन पीराजी आंबेकर (रा. उल्हासनगर, ठाणे) यांना अटक केली. दरम्यान, गांजा विक्री करण्याचे प्रकार निदर्शनास आल्यास नागरिकांनी 020-26051804 किंवा 020-26051848 या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन वैशाली पतंगे यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com