Pune News : छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५०व्या राज्याभिषेका निमित्त तब्बल ४२८० किमी सायकल प्रवास मोहिमेस सुरुवात

यावेळी या युवकांनी मावळ्यांचा वेश परिधान केला होता.
350th Chhatrapati Shivaji Maharaj Shiv Rajyabhishek 4280 km cycle journey started
350th Chhatrapati Shivaji Maharaj Shiv Rajyabhishek 4280 km cycle journey startedSakal

बालेवाडी : छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यास ३५० वर्ष होत आहेत, याचे औचित्य साधून मावळ-मुळशीतील जिगरबाज मावळे “लेह(खारदूंगला पास) ते कन्याकुमारी” असा तब्बल ४२८० किलोमीटर सायकल प्रवास करणार आहेत.

या मोहिमेची सुरुवात बाणेर येथील छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या स्मारकाला अभिवादन करुन, रुग्णवाहिका आणि सायकल पुजन करून ता.२४ सप्टेंबर रोजी करण्यात आली. प्रत्यक्ष मोहिम ता.३० सप्टेंबर रोजी सकाळी १० वा. जगातील सर्वात उंच शिखर खरदूंग ला (लेह -लडाख) इथून करण्यात आली.

या सायकल मोहिमेत (लेह खारदूंगला - ) इथून पुणे परिसरातील १२ मावळातील विनायक दारवटकर, किरण शेळके, हनुमंत जांभुळकर, विशाल डुंबरे, संदीप गोडांबे, दत्ता म्हाळसकर आणि सहकारी सहभागी झाले आहेत. यावेळी या मावळ्यांनी छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पुजन करून उणे -3.7'C तापमानामध्ये करुन, ध्येयमंत्र व शिवावंदना घेऊन उत्साहपूर्ण वातावरणात सायकल मोहीमेला सुरुवात केली.

350th Chhatrapati Shivaji Maharaj Shiv Rajyabhishek 4280 km cycle journey started
Pune PMPML : ‘क्यूआर कोड’चा १५०० प्रवाशांकडून वापर ;पहिल्या दिवशी घेतला लाभ; पालकमंत्र्यांच्या हस्ते सेवेचे लोकार्पण

मोहिमेला सुरुवात करण्यापूर्वी उपस्थित सर्व शिवभक्तांनी जय भवानी जय शिवाजी.. हर हर महादेव च्या घोषणांनी परिसर दणानून सोडला. यावेळी या युवकांनी मावळ्यांचा वेश परिधान केला होता. तसेच हातात भगवा, तसेच राष्ट्रध्वज तिरंगा घेऊन शिवरायां बरोबर आपल्या मातृभूमीस नमन केले. सदर मोहिमेसाठी बाणेर येथील जयेश मुरकुटे सोशल फांडेशन कडून रुग्वाहिका उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com