साठवण बंधाऱ्यांसाठी 38 कोटी रुपये मंजूर : ग्रहमंत्री दिलीप वळसे पाटील

आंबेगाव व शिरूर तालुक्यात एकूण ३६ दरवाजे (गेट) असलेले साठवण बंधारे बांधण्यात येणार
Dilip Walse Patil
Dilip Walse PatilSakal

मंचर - “महाराष्ट्र जल संधारण महामंडळ औरंगाबाद मार्फत आंबेगाव व शिरूर तालुक्यात शून्य ते १०० हेक्टर सिंचन क्षमतेच्या एकूण ३६ दरवाजे (गेट) असलेले साठवण बंधारे कामांसाठी ३८ कोटी १७ लाख ३१ हजार रुपये निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कोरडवाहू क्षेत्र ओलिताखाली येईल. ई- निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कामांना सुरुवात होईल.” अशी माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.

ते म्हणाले “ पिण्याच्या पाण्याचा व शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी अनेक ग्रामपंचायती, कार्यकर्ते, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्यांकडून साठवण बंधाऱ्यांच्या कामाची मागणी केली जात होती. त्यानुसार पाठपुरावा करण्यात आला आहे. या कामांचा फायदा अनेक शेतकरी कुटुंबाना होणार आहे.”

कामाचे नाव व मंजूर रक्कम

शिरूर : रावडेवाडी क्रमांक एक- २५ लाख दहा हजार रुपये, रावडेवाडी क्रमांक दोन - २६ लाख चार हजार रुपये, रावडेवाडी क्रमांक तीन- २६ लाख दोन हजार रुपये, रावडे वाडी क्रमांक चार- २७ लाख १९ हजार रुपये, रावडेवाडी क्रमांक पाच २७ लाख १६ हजार रुपये, गणेगाव खालसा बौद्ध वस्ती- ४३ लाख सात हजार रुपये, गणेगाव खालसा मलठण रस्ता- ३७ लाख ८६ हजार रुपये, गणेगाव खालसा गणेश नगर-३७ लाख ८३ हजार रुपये, गणेगाव खालसा बांगर वस्ती क्रमांक एक- २८ लाख २०हजार रुपये, गणेगाव खालसा बांगर वस्ती क्रमांक दोन-२८लाख १७ हजार रुपये, वरुडे शिंगाडे वस्ती- ४१ लाख ३१ हजार रुपये, धामारी क्रमांक एक- २६ लाख ५६ हजार रुपये, कानुर मेसाई क्रमांक एक- २५ लाख ७१ हजार रुपये, कानुर मेसाई माळीमळा-६२ लाख ५९ हजार रुपये, पाबळ क्रमांक एक-२६ लाख २५हजार रुपये, पाबळ क्रमांक दोन-२६ लाख नऊ हजार रुपये, सविंदणे भाटूक स्थळ- ३७ लाख ७२ हजार रुपये, सविंदणे सोन मळई- ३६ लाख ९१ हजार रुपये, सविंदणे वाडी-३८ लाख ५३ हजार रुपये , सविंदणे मावलाई-३५ लाख १० हजार रुपये, सविंदणे नरवडे वस्ती- ४३ लाख ५० हजार रुपये, सविंदणे शिंदे वस्ती- ३८ लाख ११ हजार रुपये, कवठे येमाई इचकेवाडी खार नाला- एक कोटी १२ लाख ८३ हजार, कवठे यमाई कांदळकर वस्ती- एक कोटी २३ लाख ९५ हजार, केंदूर माळीमळा- एक कोटी सात लाख रुपये, मुखई येवले निलख वस्ती – एक कोटी ११ लाख ९५ हजार रुपये, केंदुर पऱ्हाड मळा- दोन कोटी ७१ लाख दोन हजार रुपये, सोनेसांगवी- तीन कोटी ६७ लाख ३६ हजार रुपये.

आंबेगाव : वाळुंजवाडी पिराचा ओढा- ९८ लाख ५३ हजार रुपये, रानमळा सोनर मळा- १९ लाख ३८ हजार रुपये, लोणी खोमणे वस्ती- २१ लाख ३५ हजार रुपये, लाखनगाव- २० लाख २२ हजार रुपये, महाळूंगे पडवळ क्रमांक एक फुलेवाडी स्मशानभूमी- २६ लाख हजार ९३ रुपये, महाळुंगे पडवळ क्रमांक दोन फुलेवाडी बामन शेत-२३ लाख ९१ हजार रुपये, महाळुंगे पडवळ क्रमांक तीन फुलेवाडी- ३२ लाख १३ हजार रुपये, निघोटवाडी १७ कोटी २५ लाख ५५ हजार रुपये.

“निघोटवाडी- पांडवदरा हे गाव उजव्या कालव्याच्या पाण्यापासून वंचित आहे. येथील बंधाऱ्याच्या कामाची मागणी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे केली होती. त्यानुसार येथे दरवाजे (गेट) असलेला साठवण बंधारयाच्या कामांसाठी १७ कोटी २५ लाख ५५ हजार रुपये निधी मंजूर झाला आहे. बंधाऱ्याची लांबी १६० मीटर व उंची २३ मीटर आहे. पाणी साठवण क्षमता,९१२. ६४ स.घ.मी आहे. १९७ हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे.”

- नवनाथ निघोट, सरपंच निघोटवाडी (ता. आंबेगाव).

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com