जगभरातून आणखी ३८ विमाने मुंबईत येणार; आतापर्यंत 'एवढ्या' नागरिकांना केले 'एअरलिफ्ट!'

Airport_Mumbai
Airport_Mumbai

पुणे : वंदेभारत अभियान टप्पा ३ अंतर्गत एअर इंडियाने ३० जूनपर्यंत ३८ फ्लाईटसचे नियोजन केले असून त्यात अतिरिक्त चार्टर फ्लाईटसची ही व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे अमेरिका, रशिया, मध्य आशिया, युरोप आणि आखाती देशांमध्ये अडकलेले भारतीय नागरिक मुंबईत परतणार आहेत. 

दोहा येथून पुढील सात दिवसात ३ चार्टर विमानांच्या सहाय्याने खाडीमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले जाईल. ऑस्ट्रेलियासाठी वंदेभारत अभियानांतर्गत फ्लाईट उपलब्ध करून देण्याबाबत विदेश मंत्रालयाकडे मागणी करण्यात आली आहे.

तसेच तीन जूनपर्यंत ३० फ्लाईटसने १९ देशातील ४०१३ नागरिक महाराष्ट्रात दाखल झाले असून सर्वांना क्वॉरंटाईन करण्यात येत आहे. आलेल्या नागरिकांमध्ये १३०९ नागरिक मुंबईचे आहेत. उर्वरित महाराष्ट्रातील प्रवाशांची संख्या १६९१ इतकी आहे, तर इतर राज्यातील प्रवासी १०१३ इतके आहेत.

हे नागरिक ब्रिटन, सिंगापूर,फिलीपाईन्स, अमेरिका, बांगलादेश, मले‍शिया, कुवेत, इथियोपिया, अफगानिस्तान,ओमान, दक्षिण आफ्रिका, इंडोनेशिया, नेदरलँड, जपान, श्रीलंका, म्यानमार, टांझानिया, स्पेन, आर्यलँड या देशातून आले आहेत.

आलेल्या प्रवाशांचे क्वारंटाईन
बृहन्मुंबईतील प्रवासी यांचेसाठी इन्स्टिटयुशनल क्वॉरंटाईनची सुविधा विविध हॉटेल्समध्ये करण्यात आली आहे. इतर जिल्हयातील व राज्यातील प्रवासी यांना त्यांच्या जिल्हा मुख्यालयी पाठविण्याची व्यवस्था जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर मार्फत करण्यात येत आहे. त्यांना त्यांच्या जिल्हाधिकारी अथवा महानगरपालिका आयुक्तांमार्फत कॉरंटाईन केले जात आहे.

महसूल व वन विभाग,आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग यांच्याकडील 24 मे च्या आदेशानुसार परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी  मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. इतर राज्यातील प्रवाशांचे वाहतुक पासेस संबंधित राज्याकडून प्राप्त होईपर्यंत या प्रवाशांना मुंबई येथील कॉरंटाईन सेंटर मध्ये ठेवले जाते व सदरील प्रवाशांचा वाहतूक पास संबंधित राज्याकडून प्राप्त होताच त्यांना त्यांच्या राज्यात पाठवण्यात येत आहे.

हे अभियान केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालय, विदेश मंत्रालय व केंद्रीय गृह मंत्रालय यांच्या समन्वयाने महाराष्ट्र शासन यशस्वीरित्या पार पाडत आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com