esakal | Coronavirus:जिल्ह्यात 39 हजार जण "होम क्वारंटाइन' 
sakal

बोलून बातमी शोधा

home-quarantine

जिल्ह्यात देशांतर्गत आणि परदेशातून प्रवास करून आलेल्या नागरिकांपैकी सध्या 38 हजार 904 जणांना"होम क्वारंटाइन'करण्यात आले आहे.

Coronavirus:जिल्ह्यात 39 हजार जण "होम क्वारंटाइन' 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे- जिल्ह्यात देशांतर्गत आणि परदेशातून प्रवास करून आलेल्या नागरिकांपैकी सध्या 38 हजार 904 जणांना "होम क्वारंटाइन' करण्यात आले आहे. यात ग्रामीण भागातील सर्वाधिक 34 हजार 451 जणांचा समावेश आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जिल्ह्यात 39 हजार 521 जणांनी "होम क्वारंटाईन'चा 14 दिवसांचा कालावधी पूर्ण केला आहे. यात पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका, जिल्ह्यातील एक हजार 399 ग्रामपंचायतींसह आळंदी, लोणावळा, तळेगाव दाभाडे, राजगुरुनगर, चाकण, जुन्नर, वडगाव मावळ, बारामती, इंदापूर, भोर, दौंड, शिरूर, सासवड आणि जेजुरी या चौदा नगरपालिका आणि पुणे, देहू व खडकी या तीन कटक मंडळाच्या कार्यक्षेत्रातील प्रवाशांचा समावेश असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले. 

Coronavirus:स्थानिक संपर्कातून सर्वाधिक रुग्ण; पुण्यात कोरोनाचे 142 पैकी 122 रुग्ण परदेश दौरा न केलेले

"होम क्वारंटाइन'मधील प्रवाशांमध्ये ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील (ग्रामीण जिल्हा) 34 हजार 451, पुणे महापालिका 1 हजार 368, पिंपरी चिंचवड महानगरपालिका 1 हजार 121, नगरपालिका 1 हजार 571 आणि कटक मंडळांच्या कार्यक्षेत्रातील 110 नागरिकांचा समावेश आहे. 

हेही वाचा : पुण्यात फरासखाना, खडक, स्वारगेट व कोंढवा पोलिस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदीची कडक अंमलबजावणी

loading image