esakal | चार महिन्याचं बाळ घेऊन पळाली, कारण ऐकून पोलिसही चक्रावले

बोलून बातमी शोधा

4 month baby kidnapped from chakan rescued from Beed one woman arrested}

मुलीच्या अपहरणाबाबत राजेंद्र प्रभाकर नागपुरे (वय-५३) यांनी पोलिसांत फिर्याद दिली होती. गुन्ह्याचा तपास करताना असे समजले, की अपहरण झालेली मुलगी ही पुणे येथे शिक्षण घेत असलेल्या तरुण, तरुणीच्या प्रेमसंबंधातून झालेली आहे.

चार महिन्याचं बाळ घेऊन पळाली, कारण ऐकून पोलिसही चक्रावले
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

चाकण : चाकण येथून (ता. १७) ला अपहरण केलेली चार महिन्यांच्या मुलगी आज (ता. २४) सापडली.  अपहरण केलेल्या राणी शिवाजी यादव (वय २८ ,रा. कुत्तर विहीर, अंबाजोगाई, जि. बीड) हिला पोलिसांनी मुलीसह ताब्यात घेतले. दरम्यान, सदर महिने या चार महिन्याच्या मुलीचे अपहरण करून ती स्वतःची मुलगी असल्याचे पतीला दाखण्यासाठी अपहरण केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. चौकशीत चार महिन्यांची मुलगी ही एका तरुण-तरुणीच्या प्रेम संबंधातून जन्मलेली आहे असेही स्पष्ट झाले. त्यामुळे  सध्या ही मुलगी आता कोणाची आहे? तिचे खरे आईवडिल कोण आहेत असा प्रश्न मात्र पोलिसांना पडला आहे.


आपली मुलगी म्हणून दाखविण्यासाठी अपहरण
राणीचा सातव्या महिन्यात गर्भपात झाला होता, याबाबत तिच्या पतीला माहिती नव्हती. 4 महिन्याच्या मुलीचे अपहरण करुन ती पतीला स्वत:ची मुलगी असल्याची सांगणार होती. काम शोधण्याचा बहाण्याने ती पुण्यात आली आली होती. राजेंद्र यांच्याकडे तिने काम मिळवून त्यांच्याकडील चार महिन्याच्या मुलीचे अपहरण केले होती.

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण - पुणे पोलिसांची भूमिका संशयास्पद, तपास काढून घ्या 

अपहरण करणारी आरोपी तक्रारदाराच्या घरी होती कामाला

अपहरण करणारी राणी ही नागपूरे यांच्याकडे काम करत होती. त्यावेळी तिने 4 महिन्याच्या चिमुकलीचे चाकण परिसरातून अपहरण केले होते. अपहरणाची तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास करून राणी हिला बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई येथील कुत्तर विहिर येथून अटक केली आणि मुलीची सुटका केली आहे. 


तक्रारदारच नाहीत मुलीचे खरे आई-वडील
वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक राजपूत यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या व्यक्तीने मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार दिली ते तिचे खरे वडील नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मुलीच्या अपहरणाबाबत राजेंद्र प्रभाकर नागपुरे (वय-५३) यांनी पोलिसांत फिर्याद दिली होती. तपासादरम्यान, अपहरण झालेली मुलगी ही पुणे येथे शिक्षण घेत असलेल्या तरुण, तरुणीच्या प्रेमसंबंधातून झालेली आहे. चाकण येथील एका दवाखान्यात ही मुलगी जन्मलेली असून तिला तरुण-तरुणीचे नाव न देता फिर्यादी राजेंद्र नागपुरे यांनी स्वतःचे आणि त्यांच्या पत्नीचे नाव आई-वडील म्हणून मुलीला लावले होते.. त्यानंतर गेल्या  4 महिन्यांपासून नागपुरे मुलीचे संगोपन करत होते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 
 

मुलगी आता कोणाची?
पोलिसांनी ही मुलगी सध्या शिशूगृहात पाठविली आहे. मुलीच्या खऱ्या आई, वडिलांच्या ताब्यात न्यायालयाच्या आदेशानुसार मुलगी देण्यात येणार आहे, असे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक राजपूत यांनी सांगितले.