बारामतीत स्कूलबसखाली चिरडून चिमुकलीचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 31 मार्च 2017

सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. बारामती शहर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

बारामती : स्कूल बसखाली चिरडली गेल्याने एका 5 वर्षीय चिमुरडीचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी घडली. बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी येथे ही घटना घडली. 

चैतन्या नितीन मासाळ असे मृत्युमुखी पडलेल्या मुलीचे नाव असून, ती मूळची झारगडवाडी येथील आहे. डोर्लेवाडी येथील संत तुकाराम महाराज इंग्लिश मीडियम स्कूलमधील ती विद्यार्थिनी शाळेच्या आवारात खेळत असताना स्कूल व्हॅन रिव्हर्स गिअरमध्ये मागे येत असताना ती खाली सापडली. त्यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला. सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. बारामती शहर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

स्कूल व्हॅन डोर्लेवाडी येथीलच आहे. गाडीच्या चालकाने पोलिसांना माहिती दिली आहे. मुलीला बारामती येथील भोईटे हॉस्पिटल या खासगी रुग्णालयात उपचारांसाठी नेले होते. परंतु, तिथे पोचण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगतिले. 
 

Web Title: 4 year girl killed under school bus