Vidhan Sabha 2019 : ...तर पवारांना राज्यसभेतही जाता येणार नाही- काकडे (व्हिडिओ)

40 to 42 MLAs of Congress and NCP will be elected in Vidhan Sabha Election says sanjay Kakde
40 to 42 MLAs of Congress and NCP will be elected in Vidhan Sabha Election says sanjay Kakde

पुणे : विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे 20 ते 22 पेक्षा जास्त आमदार निवडून येणार नसल्याने शरद पवार यांना कॉंग्रेसशी जुळवून घेतल्या शिवाय राज्यसभेमध्ये जाता येणार नाही, असा दावा खासदार संजय काकडे यांनी केला आहे.

शिवाजीनगर मतदारसंघाचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांच्या निर्धारनाम्याचे प्रकाशन झाले. त्यावेळी ते पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पुण्यातील आठही मतदारसंघात भाजपचे उमेदवार जिंकणार आहेत. राज्यातील भाजप 145चा अकडा पार करेल तर शिवसेनेचे 80 ते 85 आमदार निवडून येतील. काही झाले तरी राज्यात महायुतीचे 235 उमेदवार निश्‍चित जिंकणार आहेत, असेही ते म्हणाले.



दोन्ही कॉंग्रेस मिळून 40 ते 45 पेक्षा जास्त येणार नाहीत. त्यात राष्ट्रवादीचे 20 ते 22 आमदार असणार आहेत. राज्यसभेत जाण्यासाठी 38 मतांची आवश्‍यकता असते. पण राष्ट्रवादीचे तेवढे आमदार निवडून येणार नसल्याने शरद पवार यांना कॉंग्रेसशी जुळवून घ्यावे लागेल. तरच ते राज्यसभेत जातील, असे काकडे यांनी सांगितले. तर बारामतीचा सर्वे अजून आलेला नाही असे सांगत तेथील निकालावर त्यांनी भाष्य टाळले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com