राष्ट्रवादीपक्षातून 40 युवकांचा शिवसेनेमध्ये प्रवेश

मिलिंद संगई
शनिवार, 23 फेब्रुवारी 2019

बारामती : गेल्या अनेक दिवसांपासून नाराज असलेल्या बारामती तालुक्याच्या जिरायती भागातील 40 युवकांनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून हे युवक शिवसेनेमध्ये आले असल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र काळे यांनी दिली.

बारामती : गेल्या अनेक दिवसांपासून नाराज असलेल्या बारामती तालुक्याच्या जिरायती भागातील 40 युवकांनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून हे युवक शिवसेनेमध्ये आले असल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र काळे यांनी दिली.

आज मुंबईमध्ये शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत या युवकांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. या प्रसंगी सेनेचे समन्वयक रवींद्र मिर्लेकर, जिल्हाप्रमुख राजेंद्र काळे, उपजिल्हाप्रमुख महेश पासलकर, बारामती तालुका शिवसेनाप्रमुख बाळासाहेब शिंदे, संजय काळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

जिरायत भागातील अनेक कार्यकर्ते शिवसेनेमध्ये येण्यास इच्छुक असून आगामी काळात उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा शिवसेनेमध्ये अधिकृत प्रवेश करून घेतला जाईल असे राजेंद्र काळे यांनी यावेळी सांगितले. जिरायत भागातील युवकांनी शिवसेनेत केलेला प्रवेश हा आज बारामती तालुक्याच्या ग्रामीण भागात चर्चेचा विषय होता. 

दरम्यान आज शिवसेनेत प्रवेश केलेल्यांमध्ये विराज भोसले, विशाल गुंड, विशाल काळे, गणेश भोंडवे, मनोज भोंडवे, मयूर भोंडवे, तुषार कुतवळ, संदीप सरोदे, गणेश काळे, योगेश सवाणे, प्रशांत सावंत, अक्षय भोसले, जयदीप भोंडवे, उमेश जाधव, मयूर माने, अक्षय सूर्यवंशी, सुरेश वाबळे, जनार्दन काळे, स्वप्निल गायकवाड, शंकर सुर्यवंशी, बबलू गायकवाड, तुषार निगडे, शाम काळे, स्वप्निल दाभाडे, गणेश जाधव, दीपक शेंडगे, अभिषेक गिरीमकर, अभिजीत माने, आकाश काळे, नाना खटाटे, सत्यजित सावंत, अमोल साळुंखे, निखिल शेळके, शाहूराज शितोळे, श्रीनिवास फडतरे, पप्पू गोंजारी आदी कार्यकर्त्यांचा समावेश आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 40 youths from the Nationalist Congress Party have entered Shiv Sena