बॅंक अधिकारी पदाच्या ४ हजार जागांची भरती

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

भवानीनगर - आयबीपीएस (इंडियन बॅंकिंग पर्सोनेल सिलेक्‍शन) मार्फत देशातील वीस बॅंकांमध्ये परीविक्षाधीन अधिकारी, व्यवस्थापक पदाच्या ४ हजार जागांची भरती जाहीर झाली आहे. याची ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत येत्या ४ सप्टेंबर २०१८ पर्यंत आहे.

या भरती प्रक्रियेत अलाहाबाद बॅंक, कॅनरा बॅंक, इंडियन बॅंक, सिंडिकेट बॅंक, आंध्रा बॅंक, सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसिज, युको, बडोदा बॅंक, कार्पोरेशन बॅंक, ओबीसी बॅंक, युनियन बॅंक, बॅंक ऑफ इंडिया, देना, पंजाब नॅशनल, युनायटेड बॅंक, बॅंक ऑफ महाराष्ट्र, आयडीबीआय, पंजाब ॲण्ड सिंध बॅंक व विजया बॅंकेचा समावेश आहे. 

पूर्व परीक्षा साधारणतः १३, १४, २० व २१ ऑक्‍टोबर २०१८ दरम्यान होणार आहेत. मुख्य परीक्षा ही १८ नोव्हेंबर २०१८ रोजी एकाचवेळी होईल. यातील पात्र उमेदवारांच्या मुलाखती ही जानेवारी- फेब्रुवारी २०१९ मध्ये होतील. या पदांसाठी खुल्या गटातील उमेदवार १ ऑगस्ट २०१८ रोजी किमान २० व कमाल ३० वर्षांचा असावा. ओबीसीसाठी ३ वर्षे. अनुसूचित जाती, जमातीसाठी ५ वर्षे व अपंगांसाठी १० वर्षे सवलत राहील. 

उमेदवार हा पदवीधारक असावा. बारामतीच्या राष्ट्रवादी करिअर ॲकॅडमीचे समीर मुलाणी यांनी दिलेल्या माहितीनुसार अनुसूचित जाती, जमाती व अल्पसंख्याक उमेदवारांसाठी या भरतीकरिता पूर्वपरीक्षा प्रशिक्षण केंद्रे आहेत. त्यामध्ये राज्यातील औरंगाबाद, पुणे, मुंबई, नागपूर या ठिकाणांचा समावेश आहे. या भरती परीक्षेसाठी अनुसूचित जाती, जमाती व अपंगांसाठी  १०० रुपये परीक्षा शुल्क तर इतर सर्वांसाठी ६०० रुपये शुल्क आहे. यासंदर्भात अधिक माहिती व अर्जासाठी www.ibps.in  या संकेतस्थळावर संपर्क साधावा.

Web Title: 4000 post recruitment for Bank Officer Post