Vidhansabha 2019 : महाराष्ट्र क्रांती सेना पक्षास 'या' 42 संघटनांचा पाठिंबा 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जुलै 2019

- मराठा आरक्षणासाठी स्थापन झालेल्या मराठा आरक्षण समन्वय समितीमधील विविध 42 संघटनांनी सर्वानुमते क्रांती सेनेस पाठिंबा जाहीर केला आहे.
- अखिल भारतीय मराठा महासंघ व सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, शंभोराजे युवा क्रांती, जिजाऊ ब्रिगेड यांचाही पाठिंबा

पुणे : मराठा आरक्षणासाठी स्थापन झालेल्या मराठा आरक्षण समन्वय समितीमधील सुमारे 42 संघटनांचा आहेत. या संघटनांनी समाजकारणाकडून राजकारणाकडे जाण्याचा निर्णय घेत येत्या विधानसभा निवडणुकीसाठी आपला पाठिंबा महाराष्ट्र क्रांती सेना पक्षास दिला असल्याचे समन्वय समितीचे विजयसिंह महाडीक यांनी सांगितले. 

अखिल भारतीय मराठा महासंघ व सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, शंभोराजे युवा क्रांती, जिजाऊ ब्रिगेड यांसह विविध 42 संघटनांनी सर्वानुमते क्रांती सेनेस पाठिंबा जाहीर केला आहे. समन्वय समितीमधील संघटनांची पुण्यात रविवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला आहे. यावेळी महाडीक, क्रांती सेना पक्षाचे प्रमुख सुरेश पाटील यांच्यासह संघटनांचे अध्यक्ष उपस्थित होते.

यावेळी पत्रकारांशी बोलताना पाटील म्हणाले, "समन्वय समितीमधील संघटनांनी पक्षास पाठिंबा दिल्याने पक्षाची ताकद वाढली आहे. आम्ही सध्या युतीमध्ये आहोत, पण युतीने सन्मानाने वागणूक देत विधानसभेच्या 10 जागा दिल्या नाही तर स्वतंत्रपणे राज्यात विधानसभेच्या 100 जागा लढविणार आहोत.'' विधानसभा सर्व ताकतीनेशी लढविण्यात येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. 

'या' 42 संघटनांचा पाठिंबा

शंभोराजे युवा क्रांती, छावा संघटना, अखिल भारतीय मराठा महासंघ, अखिल भारतीय मराठा सेवा संघ, मराठा आरक्षण संघटना, संभाजी ब्रिगेड, मराठा महासंग्राम, स्वाभिमानी शिवसंग्राम, मराठा शिक्षक संघटना, मावळा जवान संघटना, मराठा रियासत, मराठा शेतकरी संघटना, कुलदैवत जोतिबा मराठा संघटना, मराठा विद्यार्थी संघटना, ताराराणी ब्रिगेड, जिजाऊ भगिनी ब्रिगेड, मराठा पंचायत महाराष्ट्र, संभाजी सेना, मराठा क्रांती संघटना, संभाजी सेना, मराठा स्वराज्य संस्थापक संघटना, मराठा समन्वय समिती, छावा मराठा संघटना, कोकण मराठा विकास संघटना, मराठा व्यसनमुक्ती संघटना, मराठा कामगार संघटना, मराठा सेना, गनिमी कावा, छावा मराठा युवा महासंघ, मराठा संघर्ष समिती, शंभोभक्त सेना, शिवाजी ब्रिगेड, बापू सेवाभावी संस्था, मराठा माजी सैनिक संघटना, छावा मराठा संघटना, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी सेना, मराठा प्रकल्प ग्रस्त आणि मराठा समन्वय समिती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: This 42 unions Supports Maharashtra Kranti Sena Party