Online Fraud : ऑनलाइन टास्कचे आमिष दाखवून ४४ लाखांची फसवणूक

पार्टटाइम जॉबमध्ये ऑनलाइन टास्क पूर्ण केल्यास चांगला मोबदला देण्याच्या आमिषाने एका व्यक्तीची सुमारे ४४ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला.
online fraud
online fraudSakal

पुणे - पार्टटाइम जॉबमध्ये ऑनलाइन टास्क पूर्ण केल्यास चांगला मोबदला देण्याच्या आमिषाने एका व्यक्तीची सुमारे ४४ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. बाणेर परिसरात १५ ते २० जानेवारीदरम्यान हा प्रकार घडला.

या प्रकरणी बाणेर येथील २४ के सेरेनो बाणेर सोसायटीतील एका ४६ वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे. त्यावरून चतु:शृंगी पोलिस ठाण्यात सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीला एका अनोळखी मोबाईल क्रमांकावरून व्हॉटसॲपवर संदेश आला.

आरोपींनी फिर्यादीला टेलिग्राम ॲपवर पार्टटाइम जॉबसाठी लिंक पाठवली. त्यात गुगल मॅपवरील हॉटेलला रिव्हिह्यू रेटिंगचे टास्क दिले. त्यासाठी आरोपींनी फिर्यादीच्या खात्यात दोन हजार आठशे रुपये मोबदला जमा करून विश्वास संपादन केला. त्यानंतर वेल्फेअर टास्क क्रिन्टो शेअर ट्रेडिंग या नावाने आणखी जास्त रकमेचे प्रलोभन दाखवले.

टास्क पूर्ण करण्यासाठी फिर्यादीला वेळोवेळी बॅंक खात्यात ४३ लाख ८२ हजार रुपये भरण्यास सांगितले. परंतु कोणताही परतावा दिला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने चतु:शृंगी पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com