

Tragic Incident at Katraj Lake: Man Dies After Falling from Safety Barrier
esakal
कात्रज : कात्रज तलाव परिसरात रविवारी एक दुर्दैवी घटना घडली. तलावालगत असलेल्या कठड्यावरून खाली कोसळल्याने ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. प्राथमिक माहितीनुसार, संबंधित व्यक्ती दारूच्या नशेत असल्याचा संशय असून त्यातून हा अपघात घडल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.