हाॅस्पिटलच्या टोलवाटोलवीमध्ये जातोय सामान्यांचा बळी 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 जुलै 2020

खासगी रुग्णालयातील टोलवाटोलवीमुळे नुकताच एका ज्येष्ठाला जिवाला मुकावे लागले. या घटनेची पुनःरावृत्तीचा अनुभव सिंहगड रस्त्यावरील एका कुटुंबाला आला. त्या कुटुंबातील 45 वर्षीय व्यक्तीला अशाचप्रकारे जीव गमवावा लागला. 

सिंहगड रस्ता (पुणे) : खासगी रुग्णालयातील टोलवाटोलवीमुळे नुकताच एका ज्येष्ठाला जिवाला मुकावे लागले. या घटनेची पुनःरावृत्तीचा अनुभव सिंहगड रस्त्यावरील एका कुटुंबाला आला. त्या कुटुंबातील 45 वर्षीय व्यक्तीला अशाचप्रकारे जीव गमवावा लागला. 
विजय गोसावी (रा. सिंहगड रस्ता, हिंगणे) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. गोसावी यांना अन्ननलीकेचा त्रास होता. त्यावर त्यांचे औषधोपचार सुरू होते. मात्र, दरम्यान त्यांची प्रकृती अत्यवस्थ झाली. त्यांना पुन्हा त्रास सुरू झाला. त्यामुळे त्यांनी परिसरातील एका खासगी रुग्णालयाचे दार ठोठावले. तेथे त्यांची प्राथमिक तपासणी करण्यात आली.

दुरुस्तीसाठी थांबलेल्या लालपरीला अचानक आग

खर्चाचा अंदाज देण्यात आला. मात्र, ते आपल्या आवाक्‍याबाहेरचे असल्याचे रुग्णाच्या वडिलांनी सांगताच रुग्णालयाकडून उपचारासाठी योग्य ती साधन सामग्री नसल्याचे सांगण्यात आले. त्यावर त्यांनी परिसरातील दुसऱ्या मोठ्या रुग्णालयात विचारपूस केली. तेथेही त्यांना आवश्‍यक ती रक्कम जमा करण्यास सांगितले गेले. मात्र, रक्कम जमा करण्यास अवधी मागितल्यावर रुग्णासाठी बेडच उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा  

त्यानंतर कात्रज परिसरातील एका महापालिकेच्या रुग्णालयात गोसावी यांना घेऊन जाण्यात आले. मात्र, तेथेही कोणतीही सुविधा उपलब्ध नव्हती. अखेर त्यांना सोमवारी रात्री उशिरा ससूनमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, आज (ता.7) त्यांचा मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या रुग्णाचे वडील अर्धांगवायूने ग्रस्त आहेत. या घटनेने सिंहगडरस्ता परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A 45-year-old man on Sinhagad Road lost his life due to lack of treatment

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: