दुरुस्तीसाठी थांबलेल्या लालपरीला अचानक आग लागली; अन्...

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 7 July 2020

  • नीरा येथे मालवाहतूक करणाऱ्या एसटी बसला अचानक आग लागली
  • बसस्थानक कर्मचाऱ्यांविना पोरके

गुळुंचे : नीरा-शिवतक्रार (ता.पुरंदर) येथील बसस्थानकात मालवाहतुकीच्या दुरुस्तीसाठी थांबलेल्या लालपरीला अचानक आग लागली. पाहता पाहता बसने पेट घेतला आणि परिसरातील तरुणांनी हे पाहताच जीवाची पर्वा न करता स्थानकात धाव घेतली. नजीकच पोलीस दुरक्षेत्र असल्याने पोलिसही मदतीला धावले. ज्यूबिलंट लाईफ सायन्स कंपनीच्या अग्निशामक गाडीला बोलावून आग आटोक्यात आणण्याचा शर्थीने प्रयत्न करण्यात आला. तरुणांनी हिरिरीने गाडीतील किमती साहित्य बाहेर काढत बचाव कार्यात भाग घेतला आणि मोठा अनर्थ टळला. 

ताज्या बातम्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे अॅप

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

वाई एमआयडीसी येथून धुळे जिल्ह्यात सोलर वॉटर हिटरचे किमती साहित्य एसटी बसद्वारे नेले जात होते. दरम्यान, नीरा नदी पुलाच्या पलीकडे बसचा टायर पंक्चर झाल्याने चालकाने बस नीरा येथील स्थानकात दुरुस्तीसाठी लावली. अचानक काही वेळाने बसने पेट घेतला. त्यावेळी नजीकच्या काही तरुणांच्या लक्षात आल्यावर त्यांनी लगेच स्थानकात धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. मंगेश ढमाळ, शुभम जावळे, ओंकार घोलप, आसिफ शेख, प्रतीक कदम, राहुल जाधव तसेच इतर युवकांनी शर्थीचे प्रयत्न केले. पोलीस दुरक्षेत्रातील सुदर्शन होळकर व निलेश जाधव यांनी तातडीने घटनास्थळी हजर होत बचावकार्य केले. येथील ज्यूबिलंट लाईफ सायन्स कंपनीच्या सचिन कुलकर्णी व अमोल कड यांनी अग्निशामक बंब आणून आग विजविण्यासाठी प्रयत्न केले. या घटनेत लाखोंचे नुकसान टळले असले तरी नेमके किती नुकसान झाले आहे याबाबत चौकशी चालू असल्याचे पोलीस कर्मचारी सुदर्शन होळकर यांनी सांगितले. 
-------------
चिंताजनक ! गेल्या २४ तासात ब्राझीलनंतर भारतात जगातील सर्वाधिक मृत्यू
-------------
भारत-चीन युद्ध झाल्यास अमेरिका मैदाना उतरणार; व्हाईट हाऊसची घोषणा
-------------
दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते मंगेश ढमाळ म्हणाले, या बसस्थानकात रात्रीच्या वेळी कोणीही कर्मचारी किंवा जबाबदार व्यक्ती उपस्थित नसतात. कोरोनाकाळापूर्वीही अशीच परिस्थिती होती. तरुणांनी व पोलिसांनी प्रयत्न करत आग आटोक्यात आणली असली तरी येथील अधिकाऱ्यांवर वरिष्ठांचा कोणताही वचक नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रशासनाने याबाबत तातडीने कार्यवाही करावी. 

"सध्या कोरोना संकटकाळात बससेवा बंद असल्याने स्थानकात कोणीही उपस्थित नव्हते. तेथील सुरक्षरक्षकाने या घटनेची कल्पना दिल्यावर मध्यरात्री २ वाजता आगार प्रमुख अमोल गोंजारी यांनी घटनास्थळाला भेट देत पाहणी केली आहे. तसेच वाहतूक निरीक्षक या नात्याने मला समजल्यावर मीही त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली आहे. बसचे अंदाजे ५० हजार तर साहित्याचे अंदाजे अडीच लाख रुपयांपर्यंत नुकसान झाल्याची शक्यता आहे. सोलरच्या ३१ पैकी १३ टाक्या खराब झाल्या आहेत. - इसाक सय्यद , वाहतूक निरीक्षक, बारामती आगार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cargo bus suddenly caught fire in Nira Bus Stand

Tags
टॉपिकस
Topic Tags: