जुन्नर: अनधिकृत शेडमध्ये आढळले 460 किलो गोमांस

दत्ता म्हसकर
गुरुवार, 10 मे 2018

जुन्नर - जुन्नर शहरातील माई मोहल्ला येथे नाल्याजवळ उभारलेल्या तात्पुरत्या पत्र्याच्या शेडमध्ये ४६ हजार रुपये किमतीचे ४६० किलो गोमांस जुन्नर पोलिसांना सापडले.

कुरेशी याने काही दिवसांपूर्वी येथे जनावरांची कत्तल केली परंतू टाकाऊ भागाची विल्हेवाट लावली नाही. बुधवारी ता. ९ रोजी दुपारी येथे काही जुने व काही ताजे मांस सापडले. मांस साठवून ठेवल्याने या परिसरात दुर्गंधी पसरली होती. नागरिकांच्या आरोग्याची समस्या देखील निर्माण झाली होती. नागरिकांनी केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी कारवाई केली आहे. 

याबाबत पोलिसांनी गोवंश कायदा(नविन सुधारणा1995)चे क.5, 5(अ)(ब), 9(अ)भा.प्रा.सं.अधिनियम सन 1960चे क.11 सह भा.द.वि.क 269,270 प्रमाणे कुरेशी याच्या विरुद्ध बुधवारी ता.9 रोजी रात्री गुन्हा दाखल केला असल्याचे पोलिस निरीक्षक कैलास घोडके यांनी सांगितले.

याबाबत पोलिस कर्मचारी प्रशांत रामदास पवार यांनी फिर्याद दिली असून, पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ दिवटे पुढील तपास करीत आहेत.

जुन्नर शहराच्या काही भागात अशा प्रकारच्या अनधिकृत तात्पुरत्या पत्र्याच्या शेड मोठ्या प्रमाणात उभारल्या असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी असून, या शेडमध्ये रात्रीच्या वेळी जनावरांची कत्तल करून मांस वाहनातून बाहेरगावी पाठविले जाते. या बेकायदेशीर शेडवर नगर पालिकेने कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. कत्तलीसाठी बाहेरगावाहून जनावरे आणली जातात व कत्तल करून मांस वाहनातून नेले जाते. या प्रकाराला पायबंद बसावा यासाठी पोलिसांनी ठोस कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

Web Title: 460 kg of beef found in unauthorized sheds