esakal | धक्कादायक! पुणे जिल्ह्यातील आणखी साडेचार हजार जणांमध्ये दिसली कोरोनाची लक्षणे
sakal

बोलून बातमी शोधा

corona_checkup

आतापर्यंत १ हजार १९६ प्रवाशांना क्वॉरंटाइन करण्यात आले होते. त्यापैकी १ हजार ३३ जणांचा १४ दिवसांचा क्वॉरंटाइन कालावधी पूर्ण झाल्याने त्यांनाही घरी सोडण्यात आले.

धक्कादायक! पुणे जिल्ह्यातील आणखी साडेचार हजार जणांमध्ये दिसली कोरोनाची लक्षणे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील आणखी ४ हजार ७७१ जणांना कोरोना विषाणू संसर्ग सदृश्य लक्षणे असल्याचे आढळून आले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

यापैकी एक हजार ४७७ जणांनी कोरोना संशयित रुग्ण नोंदणीसाठी कार्यान्वित करण्यात आलेल्या आयडीएसपी (इंटिग्रेटेड डिसीज सर्व्हायलन्स प्रोग्राम) या संकेतस्थळावर याबाबत नोंदणी केली आहे. उर्वरित ३ हजार २९४ जणांची गुगल फॉर्मद्वारे माहिती मिळाली आहे. 

- पुण्यात कोरोनाच्या विर्सजनाचा 'श्रीगणेशा'; काय घडलं वाचा!

दरम्यान, या सर्व संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. तपासणीनंतर यापैकी १९३ संशयित रुग्णांच्या घशातील द्रवाचे नमुने घेण्यात आले आहेत. 

पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आतापर्यंत ४४ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी ५ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच ११८ जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यापैकी १०४ जणांना उपचारानंतर घरी परत सोडले आहे. अन्य १४ जणांवर उपचार सुरू आहेत. 

- केंद्राचे पथक म्हणते, बारामतीचे हे काम देशभरात व्हावे...

दरम्यान, आतापर्यंत १ हजार १९६ प्रवाशांना क्वॉरंटाइन करण्यात आले होते. त्यापैकी १ हजार ३३ जणांचा १४ दिवसांचा क्वॉरंटाइन कालावधी पूर्ण झाल्याने त्यांनाही घरी सोडण्यात आले. सध्या १६३ जण क्वॉरंटाइन आहेत.

- मोठा दिलासा : महाराष्ट्रात लॉकडाऊन नव्हे, एजंट बेस्ड मॉडेलचा पर्याय

कोरोनासदृश लक्षणे असलेले संशयित

आंबेगाव - २००, बारामती - ११४६, भोर - ६५६, दौंड - १०९, हवेली - ९१, इंदापूर - १७१, जुन्नर - १४४, खेड - १०८, मावळ - ७६, मुळशी - ४४२, पुरंदर - ४२०, शिरुर - ११८३ आणि वेल्हे - २५.

loading image